HomeमनोरंजनT20 world cup 2026 USA team Include India Pakistan players same squad...

T20 world cup 2026 USA team Include India Pakistan players same squad sri Lanka | टी20 वर्ल्ड कपमध्ये एकाच संघात भारत-पाकिस्तानचे खेळाडू! श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचीही संघात एन्ट्री


T20 WC 2026 USA संघ: टी20 वर्ल्ड कप 2026 साठी अमेरिकेने जाहीर केलेला संघ चर्चेचा विषय ठरत आहे. कारण हा संघ पाहता तो पारंपरिक अर्थाने ‘अमेरिकन’ कमी आणि भारतीय उपखंडातील खेळाडूंनी भरलेला अधिक वाटतो. या संघात भारतीय, पाकिस्तानी आणि श्रीलंकेच्या वंशाचे खेळाडू मोठ्या संख्येने सामील आहेत. अमेरिकन संघाची धुरा गुजरातमधील आनंद येथे जन्मलेल्या 32 वर्षीय मोनांक पटेलकडे सोपवण्यात आली आहे. मोनांकने याआधीही टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये संघाचे नेतृत्व केले होते. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. या वेळी जाहीर झालेल्या संघात 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेले तब्बल 10 खेळाडू कायम ठेवण्यात आले आहेत. याशिवाय श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला अनुभवी खेळाडू शेहान जयसूर्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. 34 वर्षीय शेहानने श्रीलंकेसाठी 12 वनडे आणि 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याचा अनुभव अमेरिकन संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बहुतेक खेळाडू भारतीय मुळाचे

या संघातील बहुतेक खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. मोनांक पटेल, जेसी सिंह, मिलिंद कुमार, साईतेजा मुक्कामाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंह, नोस्तुष केंजीगे, सौरभ नेत्रवलकर आणि शुभम रंजन हे खेळाडू भारतीय पार्श्वभूमीतून आलेले आहेत.
पाकिस्तानी मुळाचे तीन खेळाडूही अमेरिकेच्या जर्सीत

पाकिस्तानी मुळाचे तीन खेळाडूही अमेरिकेच्या जर्सीत दिसणार आहेत. शायन जहांगीर, अली खान आणि मोहम्मद मोहसिन हे पाकिस्तानमधून स्थलांतरित कुटुंबातून आले असून ते संघाच्या फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी विभागात महत्त्वाची भूमिका बजावतात.

याशिवाय अँड्रीज गौस आणि शॅडली व्हॅन शल्कविक हे दक्षिण आफ्रिकन मुळाचे खेळाडूही संघात आहेत. एकूण पाहता अमेरिकेच्या या संघात 9 भारतीय मुळाचे, 3 पाकिस्तानी मुळाचे, 1 श्रीलंकेचा आणि 2 दक्षिण आफ्रिकन मुळाचे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे या संघात मूळचा अमेरिकन जन्माचा एकही खेळाडू नाही, ही बाब अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

यूएसए चा T20 विश्वचषक 2026 असोसिएशन

मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंह (उपकर्णधार), अँड्रीज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, साईतेजा मुक्कामाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंह, नोस्तुष केंजीगे, शॅडली व्हॅन शल्कविक, सौरभ नेत्रवलकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजन

t20 विश्वचषक 2026

USA चे ग्रुप स्टेज सामने

  • 7 फेब्रुवारी 2026: भारत विरुद्ध USA – मुंबई
  • 10 फेब्रुवारी 2026: पाकिस्तान विरुद्ध USA – कोलंबो
  • 13 फेब्रुवारी 2026: नेदरलँड्स विरुद्ध USA – चेन्नई
  • 15 फेब्रुवारी 2026: न्यूझीलंड विरुद्ध USA – चेन्नई





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...
spot_img

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
error: Content is protected !!