Homeदेश-विदेशIndia Europe Trade Deal Free Trade Agreement Pm Narendra Modi and Mother...

India Europe Trade Deal Free Trade Agreement Pm Narendra Modi and Mother Of All Deal | India–EU Free Trade Agreement: भारत-युरोपमध्ये मोठा करार, कोणती उत्पादने होणार स्वस्त?


उर्वशी खोणा, झी मिडिया, दिल्ली: 2026 ते 2027 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. वाढती महागाई पाहता सर्वांचेच याकडे लक्ष लागले आहे. अशात कार लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज 27 जानेवारी 2026 रोजी भारत आणि युरोपियन युनियन मध्ये एक ट्रेड करार झाला. या भारत-ईयू करारामुळे मद्य आणि लक्झरी कार स्वस्त होणार आहेत. अलिशान कार वरील कर 110 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले. याच सोबत इतर अनेक उत्पादनांचे करही कमी करण्यात आले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

वैद्यकीय उपकरणांवर इतक्या टक्क्याने कर कमी

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये झालेल्या या करारात, युरोपमधून आयात केलेल्या अनेक उत्पादनांवरील अतिरिक्त कर काढून टाकण्यास आणि कमी करण्यावर सहमती झाली आहे. रसायने, विमाने, अंतराळ उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यांवरील करही कमी करण्यात आले आहेत. तसेच वैद्यकीय आणि शस्त्रक्रिय उपकरणांवरही आता 90 टक्क्यांपर्यंत कर कमी करण्यात आले आहेत.

युरोपियन वाईनवरील करही होईल कमी

या करारामुळे युरोपमधून आयात केलेल्या अन्न उत्पादनांवरील कर कमी झाला आहे. ⁠ऑलिव्ह ऑइल, मार्जरीन आणि इतर वनस्पती तेले आता करमुक्त असतील. युरोपियन देशांमधून येणाऱ्या वाईनवर सध्या 150 टक्के कर आकारला जातो, हा कर 20-30 टक्के पर्यंत कमी केला जाईल. तसेच बिअरवरील कर 110 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. तर, स्पिरिट्सवरील कर 40 टक्के असेल.

कार आणि यंत्रसामग्रीवरही सवलत

तसेच या करारातून युरोपियन कारवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. हे आयात शुल्क हळूहळू 10 टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल. याशिवाय दरवर्षी 2.5 लाख वाहनांचा कोटा निश्चित केला आहे. यंत्रसामग्रीवरील 44 टक्के आणि रसायनांवरील 22 टक्के कर देखील अक्षरशः काढून टाकले जातील. ⁠जवळजवळ सर्व विमाने आणि अवकाश-संबंधित उत्पादने आता शुल्कमुक्त असतील, ज्यामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला लक्षणीय फायदा होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात रविवारी होणार बजेट सादर

दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करतील. यावेळच्या बजेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे,  1 फेब्रुवारी रोजी रविवार आहे आणि भारतीय बजेटच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी बजेट सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे 9 वे बजेट असणार आहे. तसेच रविवार असल्याळे शेअर बाजार सुरू राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र बजेटमुळे या दिवशी शेअर बाजार व्यवहार सुरू ठेवण्याची शक्यता आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!