Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, महेश लांडगे यांनी माफी मागितली शोकसभेचा व्हिडिओ...

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, महेश लांडगे यांनी माफी मागितली शोकसभेचा व्हिडिओ व्हायरल


अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू महेश लांडगे व्हिडिओ: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधानाने महाराष्ट्राने एक कर्तृत्वान आणि तळागाळाशी जोडलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. 29 जानेवारी रोजी बारामतीमध्ये लाखो समर्थकांबरोबरच अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यात आला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

महेश लांडगे चर्चेत

अजित पवारांच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार ठरत आहे ते भाजपाचे महेश लांडगे! काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकींदरम्यान लांडगेनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. अजित पवारांच्या निधनानंतर महेश लांडगे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. महेश लांडगेंनी अजित पवारांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन खेद व्यक्त केला. तसेच त्यांनी अजित सृष्टी उभारण्याची घोषणाही केली. महेश लांडगेंनी केलेल्या टीकेवरुन काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पत्रकार परिषदेत ‘तो मोठा नेता आहे. तो अजित पवारला फालतू समजतो’ असं म्हणत खोचक टोला लगावला होता. मात्र आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये महेश लांडगेही उपस्थित होते. त्यांनी अवघ्या 40 सेंकंदांमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करुन मंच सोडल्याचं पाहायला मिळालं.

मंचावर आल्यावर काय बोलले लांडगे?

अजित पवारांचा आरे, तुरे असा उल्लेख करुन टीका करणाऱ्या महेश लांडगेंनी मंचावर आल्यानंतर मंचाच्या मध्यभागी ठेवलेल्या अजित पवारांच्या फोटोसमोर फुलं वाहिली. त्यानंतर मंचावरील पोडियमजवळ पोहोचले. माईक सरळ केला आणि ‘उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जड अंतकरणाने आलेला आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं. माझ्या स्वत:ला लांडगे परिवाराच्यावतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो,’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या फोटोकडे पाहिलं आणि हात जोडून, “दादा मला माफ करा,” असं मान खाली घालत म्हटलं आणि पुढे काहीही न बोलता मंच सोडला.

प्रत्येकाच्या आठणींतील दादा ऐकून…

महेश लांडगेंनी सोशल मीडियावर या शोकसभेतील एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ते अजित पवारांच्या फोटोसमोर फुलं वाहताना दिसत आहेत. “महाराष्ट्राचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आली. प्रत्येकाने आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या आठणींतील दादा ऐकून मन भरुन आले,” अशी कॅप्शन फोटोला दिली आहे.

महेश लांडगेंनी केलेल्या या दोन्ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!