Homeदेश-विदेशबेंगळुरूमधील अधिकाऱ्यावर छापा टाकल्यानंतर आत्मविश्वास गटाचे अध्यक्ष सीजे रॉय यांनी स्वतःवर गोळी...

बेंगळुरूमधील अधिकाऱ्यावर छापा टाकल्यानंतर आत्मविश्वास गटाचे अध्यक्ष सीजे रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडली


कॉन्फिडंट ग्रुपच्या अध्यक्षाची आत्महत्या: प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी कॉन्फिडंट ग्रुपचे चेअरमन आणि उद्योजक सीजे रॉय यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्याच कार्यालयात टोकाचं पाऊल उचललं. ते 57 वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी आत्महत्या केली तेव्हा कार्यालयात आयकर विभागाने धाड टाकली होती. कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी तपास करत असतानाच सीजे रॉय यांनी आपल्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस यासंदर्भात सविस्तर तपास करत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

यापूर्वी गुरुवारी सकाळी आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले होते. या छाप्यांदरम्यान, त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा त्यांच्याकडे अधिक मालमत्ता असल्याचे कथितरित्या उघड झाले होते. एक प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर असलेला कॉन्फिडेंट ग्रुप दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषतः केरळ आणि कर्नाटकमध्ये कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीजे रॉय यांनी अशोकनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लैंगफोर्ड टाऊनमधील आपल्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना एचआरएस लेआऊटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, मृतदेह अनेकल येथील नारायण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरीच्या संदर्भात आयकर (आयटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॉन्फिडंट ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकला होता. ही चौकशी सुरू ठेवत अधिकाऱ्यांनी आज कॉन्फिडंट ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकला.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, कॉन्फिडंट ग्रुप हा केरळमधील एक टॉप बिल्डर आहे. तो कोची, तिरुवनंतपुरम, त्रिशूर, कालिकत, कोट्टायम आणि बंगळुरू येथे लक्झरी फ्लॅट आणि अपार्टमेंट प्रोजेक्टवर काम करतो. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सीजे रॉय यांना आवडायच्या मारुती कार

सीजे रॉय हे कॉन्फिडंट ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष होते, जे रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतलेले होते. त्यांनी 1994 मध्ये त्यांची पहिली मारुती 800 खरेदी केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो शोधली आणि 27 वर्षांनंतर त्यांनी 10 लाखांना खरेदी केली. त्यांच्याकडे रोल्स-रॉइस, फेरारी आणि कोएनिगसेग यासारख्या लक्झरी कारचा संग्रह होता, परंतु मारुती त्यांची आवडती वाटत होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!