Homeमहाराष्ट्रmaharashtra weather news 30 जानेवारी 2026 हवामान अंदाज गारपिटीचा पाऊस आणि उत्तरेकडील...

maharashtra weather news 30 जानेवारी 2026 हवामान अंदाज गारपिटीचा पाऊस आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट महाराष्ट्रात तापमानात वाढ


महाराष्ट्र हवामान बातम्या: देशातील हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद ठरलेला नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असणारं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र आता दूर सरलं असून काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. राज्यात हिवाळ्यानं अखेरच्या टप्प्यात प्रवेश केला असून, त्यामुळं हवेतील उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असं असलं तरीही एक अनपेक्षित स्थिती राज्यातील हवामानात पाहायला मिळेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हिवाळा सरणार, पण मग नेमकं काय घडणार?

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमीजास्त होत असला तरीही आता महाराष्ट्रावर मात्र या स्थितीचा फारसा परिणाम दिसून येत नाहीय. राज्यात पुढील काही दिवस पहाटेच्या वेळी आणि रात्री उशीरानं दुर्गम गावखेड्यांमध्ये धुक्याची स्थिती पाहायला मिळेल. घाटमाथ्यावरील परिसर, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भागसुद्धा इथं अपवाद ठरणार नाही. या धुक्याचा थेट दृश्यमानतेवर परिणाम होणार असल्यामुळं दिल्ली- हरियाणातील धुक्याच्या चादरीप्रमाणंच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातही ओढावताना दिसेल.

किनारपट्टी भाग आणि मुंबईसाठी कोणता इशारा?

राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबईत हवामान अंशत: दमट आणि कोरडं असेल. आकाश बहुतांशी निरभ्र असून कमाल सरासरी तापमान 30 अंशांदरम्यान आणि किमान तापमान 24 अंशांदरम्यान असेल. दरम्यानच्या काळात कुठंही पावसाचा इशारा मात्र नाही.

पश्चिम महाराष्ट्रातही तापमानवाढीस सुरुवात झाली असून सातारा, सांगली, कोल्हापुरात आकाश काही भागांमध्ये अंशत: ढगाळ असेल, थंडीचा कडाका कमी झाला असला तरीही इथं हवेत गारठा मात्र कायम असेल. जिथं सरासरी कमाल तापमान 30 ते 32 अंश आणि किमान सरासरी तापमान 18 ते 20 अंशांदरम्यान असेल असा अंदाज आहे.

कोणत्या राज्यांना बसणार पावसाचा तडाखा?

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील 8 राज्यांना भीषण थंडीचा इशारा असून, यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढचा समावेश आहे. तर, 5 राज्यांना पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये राजस्थान, हिमाचलचा काही भाग, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. या पावसाच्या अंदाजातच ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, त्यामुळं काही अडचणी उद्भवू शकतात, ज्या धर्तीवर सावधगिरी बाळगण्याच्या सूचना यंत्रणांनी केल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!