Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा इतिहास:बिहार निवडणुकीत झाला वापर, CM-DCM नी केला होता...

अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा इतिहास:बिहार निवडणुकीत झाला वापर, CM-DCM नी केला होता प्रवास; पायलटही सुमित कपूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, ज्या विमानाचा अपघात झाला त्या ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) विमानाबद्दल आणि ते चालवणाऱ्या कंपनीबद्दल अनेक खळबळजनक तपशील समोर येत आहेत. हे विमान केवळ अजित दादांच्या प्रवासासाठीच नाही, तर यापूर्वी देशातील अनेक दिग्गज नेत्यांच्या दिमतीलाही होते, अशी माहिती आता समोर आली आहे. बारामती येथे बुधवारी (२८ जानेवारी) झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानाचा इतिहास अत्यंत ‘हाय-प्रोफाईल’ असल्याचे समोर आले आहे. व्हीएसआर व्हेंचर्स (VSR Ventures) या कंपनीच्या मालकीच्या ‘लिअरजेट ४५’ या विमानाने गेल्या वर्षीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना सेवा दिली होती. फडणवीसांसह शिंदेंनी केला होता प्रवास मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांकडून याच विमानाचा वापर करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रचारासाठी पाटण्याला जाण्यासाठी याच विमानाचा वापर केला होता. विशेष म्हणजे, कालच्या अपघातात जीव गमावलेले कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी यांनीच या नेत्यांचे वैमानिक म्हणून काम पाहिले होते. कंपनीची मालकी आणि पार्श्वभूमी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ ही कंपनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथील रहिवासी कॅप्टन व्ही. के. सिंह यांच्या मालकीची आहे. या कंपनीच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण ज्येष्ठ पत्रकार सुहेल सेठ आणि इतरांनी या कंपनीच्या विमानांच्या देखभाल-दुरुस्तीवर गंभीर आरोप केले आहेत. अपघाताच्या दिवशीचे नियोजित वेळापत्रक २८ जानेवारी रोजी या विमानाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त होते. अजित पवारांना बारामतीत सोडल्यानंतर हे विमान तेलंगणातील शमसाबाद विमानतळावरून आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध व्यापारी महेश कुमार रेड्डी यांना घेऊन पाटण्याला जाणार होते. सकाळी १०:३० वाजता हे विमान पाटण्याला उतरणे अपेक्षित होते. रात्री ९:३० वाजता पुन्हा पाटण्याहून उड्डाण करण्याचे नियोजन होते. मात्र, बारामतीत झालेल्या भीषण अपघातामुळे हे नियोजन कोलमडले आणि त्यानंतर महेश रेड्डी यांना दुसऱ्या चार्टर्ड विमानाने पाटण्याला जावे लागले. DGCA कडून अपघाताचा तपास सुरू एकाच विमानाने देशातील इतक्या महत्त्वाच्या नेत्यांना सेवा दिली असताना, त्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड झाली होती का? तसेच या विमानाचा देखभालीचा रेकॉर्ड कसा होता? या दिशेने आता नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) तपास करत आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!