Homeमहाराष्ट्रमाजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्म पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा बचाव...

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्म पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा बचाव करणाऱ्या संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निंदा केली.


संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारांनी पद्म पुरस्कार देण्याच्या निर्णयाचं समर्थन करण्यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न करण्यावरुन झालेल्या वादावरही भाष्य केलं आहे. राहुल गांधींनी ईशान्य भारतीय गमछा परिधान न करण्यावरुन झालेल्या वादातून राऊतांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

राहुल गांधींच्या गमछा प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना टोला

राहुल गांधींनी ईशान्य भारतीय गमछा परिधान न करण्यावरुन भाजपाने केलेल्या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं आहे. “अनेकांनी ते गमछे घातले नाहीत असे खूप फोटो माझ्याकडे आहेत. गमच्या घातला नाही म्हणून कुठल्यातरी विचारसरणीचा ठपका लावून राष्ट्रध्वही मान्य भारताच्या जनता पार्टीचा खेळ आहे. राजनाथ सिंहना तुम्ही राष्ट्रद्रोही मानणार का? भारतीय जनता पार्टीकडे भरपूर वेळ आणि पैसा आहे त्यांना आयटी डिपार्टमेंटला देण्यासाठी,” असा टोला राऊतांनी लगावला.

कोश्यारींचं समर्थन करण्यावरुन फडणवीसांना सुनावलं

फडणवीसांनी कोश्यारींना पद्म पुरस्कार देण्यावरुन टीका करणाऱ्या राऊतांची विचारसरणी संकुचित असल्याची टीका केली होती. या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना संकुचित वाटत असेल तर मी त्यांना कोपऱ्यापासून नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, महात्मा फुले सावित्री फुले यांचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गंमत वाटते आणि अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिलं त्याचा समर्थन करत असतील तर या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय बोलावं?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> शिंदेंना सर्वात मोठा धक्का? ‘हा’ नेता भाजपाच्या वाटेवर? राऊत म्हणाले, ‘दावोसमध्ये काय…’

“त्यावेळेसही भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले होते. जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो तेव्हा त्याची सारवासारव करण्याची जबाबदारी दिल्ली न फडणवीसांना दिली आहे. आंबेडकरांचा अपमान महाजन यांनी केला ना काल ही त्यांची परंपरा आहे. आणि जर मोदी जर कोश्यारींचा सन्मान करत असतील तर महाराष्ट्राचं नाव तोंडात घेण्याचा अधिकार आहे का त्यांना?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

कोश्यारींना पुरस्कार देण्यावरुन फडणवीस काय म्हणालेले?

“कोशयारी यांचे जीवन प्रगल्भ आहे. त्यांचे मोठे कार्य म्हणजे वन रँक वन पेन्शन आहे. पहाडी भागात त्यांचे मोठे काम आहे. टीका करणारे छोट्या मनाचे लोक असल्याने ते विरोध करीत आहेत. कोणाच्या काळात कोणाला आणि कसे गौरविले, हे आता बोलणे योग्य नाही,” असा खोचक टोला फडणवीसांना कोश्यारींना मिळालेल्या पुरस्काराचं समर्थन करताना राऊतांना लगावल्याचं प्रजासत्ताकदिनी पाहायला मिळालं. आता याच विधानावरुन राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

महाजन विषयावर पडदा टाकू शकतो, कारण…

गिरीश महाजनांच्या प्रकरणावर बोलताना राऊतांनी, “त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा टाकू शकतो. त्या महिलेनी बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून भावना उंबळून आल्या त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. त्या जाधव नावाच्या महिला आहेत त्यांचा मी स्वागत करतो,” असं उत्तर दिलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!