Homeमहाराष्ट्रबँक कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद:बँकिंग आठवडा 5 दिवसांचा करण्याची मागणी; सर्व राष्ट्रीयीकृत...

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद:बँकिंग आठवडा 5 दिवसांचा करण्याची मागणी; सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने २७ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेला देशव्यापी बँक संप यशस्वी झाला. पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण व्हावी, यासाठी हा संप करण्यात आला होता. या संपात सर्व राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यात स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसमोर सर्व बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. मार्च २०२४ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची मागणी मान्य करण्यात आली होती. मात्र, या कराराला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळेच बँक कर्मचाऱ्यांना संपाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी माहिती स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी दिली. सध्या बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ देता येईल, असे मुळे यांनी नमूद केले. बँक कर्मचारी यांच्या कामकाजात सातत्याने ताणतणाव असतो त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणे देखील गरजेचे आहे. इन्शुरन्स, रिझर्व्ह बँक, तसेच शेअर मार्केटसह अनेक वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसीय कामकाजाची अंमलबजावणी होत असताना, बँकिंग क्षेत्रात मात्र याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची अंमलबजावणी न केल्यास, भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने व संप करण्यात येतील, असा इशाराही राजेश मुळे यांनी दिला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!