HomeमनोरंजनT20 वर्ल्ड कप गौतम गंभीरला सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगितले अजिंक्य रहाणेची...

T20 वर्ल्ड कप गौतम गंभीरला सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगितले अजिंक्य रहाणेची सूचना


T20 विश्वचषक गौतम गंभीर: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरं तर त्यांच्यासंदर्भातील चांगल्या गोष्टी असोत किंवा वाईट, कोणत्याही कारणामुळे गौतम गंभीर चर्चेत राहू शकतो असं मागील काही काळापासून दिसून येत आहे. सध्या गंभीर चर्चेत असण्याचं कारण ठरत आहे त्याचं सोशल मिडिया अकाऊंट! काही दिवसांपूर्वी, मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरने काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या एका पोस्टला उत्तर दिले होते. थरूर यांनी म्हटले होते की, पंतप्रधानपदानंतर भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाचं पद स्वीकारणं हे देशातील दुसरे सर्वात कठीण काम आहे.  थरूर यांच्या या पोस्टला गौतम गंभीरनेही रिप्लाय दिला होता. गंभीरने दिलेल्या उत्तरात त्याने प्रशिक्षकाला ‘अमर्याद अधिकार’ मिळतात हा चुकीचा समज असल्याचं म्हटलं होतं. मात्र गंभीरने केलेल्या रिप्लायवर भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेनं नाराजी व्यक्त करत एक सल्ला दिला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

थरुर काय म्हणालेले?

थरूर यांनी नागपूरमधील सामन्यादरम्यान गौतम गंभीरची भेट घेतली होती. तेव्हा गंभीरबरोबर काढलेला सेल्फी पोस्ट करत त्यांनी सोशल मीडियावर,”नागपूरमध्ये, माझा जुना मित्र आणि पंतप्रधानांनंतर भारतातील सर्वात कठीण काम करणाऱ्या गौतम गंभीरबरोबर सकारात्मक आणि मनमोकळी चर्चा करण्याचा आनंद घेतला! दररोज लाखो लोक त्याच्याबद्दल उलटसुलट बोलत आहेत, पण तो शांत राहतो आणि निर्भयपणे पुढे चालत राहतो. त्याच्या शांत निश्चयी वृत्ती आणि सक्षम नेतृत्वाबद्दल माझ्याकडून हे कौतुकाचे दोन शब्द. त्याला वर्ल्डकपच्या पूर्वी म्हणजेच आजपासूनच सर्व यशासाठी शुभेच्छा!” असं म्हटलं होतं.

गंभीरने आपले संपूर्ण लक्ष…

गंभीरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, रहाणेनेनं गंभीरने फेब्रुवारीपासून सुरु होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत सोशल मीडियापासून दूर रहावे असा सल्ला दिला आहे. मायदेशात होणारा टी-20 विश्वचषक हा आगामी काळात भारतीय संघासमोरील मोठं आवाहन ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची सध्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेकडे या मोठ्या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पण, टी-20 विश्वचषक सुरू व्हायला अजून काही आठवडे बाकी असताना, गंभीरला आपले संपूर्ण लक्ष संघावर केंद्रित करण्याचा आणि सोशल मीडियावर लक्ष न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गंभीरने हे केलं तर भारतीय संघाला फायदा होईल

“यावर माझे एकच उत्तर आहे की, गौतम गंभीरने सोशल मीडियापासून दूर राहावे. लोक त्याच्याबद्दल काय बोलत आहेत किंवा त्याला काय सांगत आहेत याचा त्याने जास्त विचार करू नये. तो खेळाडू म्हणून कायमच उत्तम प्रकारे क्रिकेट खेळला आहे. आता तो टीम इंडियाला प्रशिक्षण देतोय. भारतीय संघाचा प्रशिक्षक हे फारच जबाबदारीचे काम आहे,” असे रहाणेने ‘क्रिकबझ’शी चर्चा करताना सांगितले. गंभीरने वर्ल्डकपची स्पर्धा संपेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्याचं ठरवलं तर याचा त्याला आणि पर्यायाने संघाला खूप फायदा होईल असं अजिंक्यने म्हटलं आहे.

“त्याने सोशल मीडियापासून दूर राहावे आणि संघावर लक्ष केंद्रित करावे. हे माझे वैयक्तिक मत आहे. संघ म्हणून टीम इंडियाने मुख्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करा; विश्वचषक संपेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहा,” असा सल्ला रहाणेनं दिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!