Homeमनोरंजनपाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान माझ्याशी गैरवर्तन झाल्याचा...

पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान माझ्याशी गैरवर्तन झाल्याचा दावा करणारी पोस्ट हटवली


पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पीने T20 WC वरील पोस्ट हटवली: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीने आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशला वगळण्यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र नंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट डिलीट का केली यासंदर्भात त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला ऑनलाइन फार शिवीगाळ करण्यात आल्याचं आणि टीका झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णय प्रक्रियेबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करण्यासाठी गिलेस्पीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली होती.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात प्रवास करण्याबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे आणि त्यांचे सामने श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केल्यामुळे, टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली आहे.

आता डिलीट झालले्या पोस्टमध्ये गिलेस्पीने विचारलं होतं की, “बांगलादेश त्यांचे सामने भारताबाहेर का खेळू शकला नाही, याचे स्पष्टीकरण आयसीसीने दिले आहे का? माझ्या आठवणीनुसार, भारताने पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यास नकार दिला होता आणि त्यांना ते सामने पाकिस्तानबाहेर खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. कोणीतरी मला हे समजावून सांगेल का?”

गिलेस्पीचा प्रश्न सामने हलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांना समजून घेण्याच्या उद्देशाने विचारलेला दिसत होता, आणि त्याने नमूद केले की भूतकाळात इतर संघांसाठीही अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती.

त्या पोस्टनंतर, 50 वर्षीय गिलेस्पीला तीव्र टीकेला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्याला ती पोस्ट काढून टाकावी लागली. जेव्हा एका सोशल मीडिया युजरने त्याला विचारलं की त्याने ती पोस्ट का हटवली? तेव्हा गिलेस्पी म्हणाला: “कारण एक साधा प्रश्न विचारल्याबद्दल मला शिवीगाळ करण्यात आली, म्हणूनच”.

बीसीबीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर आयसीसीने शनिवारी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडची अधिकृतपणे निवड केली. एका सविस्तर निवेदनात, त्यांनी स्पष्ट केलं की, तीन आठवड्यांच्या विस्तृत चर्चेनंतर स्पर्धेच्या वेळापत्रकाची पवित्रता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे: “आयसीसीने बीसीबीने उपस्थित केलेल्या चिंतांचा आढावा घेतला, अंतर्गत आणि बाह्य तज्ञांकडून स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकने करून घेतली आणि त्यांचा विचार केला, तसेच केंद्र आणि राज्य स्तरावरील व्यवस्था, तसेच स्पर्धेसाठी वाढीव आणि टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रोटोकॉलसह तपशीलवार सुरक्षा आणि कार्यप्रणाली योजना सामायिक केल्या. हे आश्वासन अनेक टप्प्यांवर पुन्हा देण्यात आले, ज्यात आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन (आयबीसी) मंडळाच्या चर्चेदरम्यानचाही समावेश आहे.”

आयसीसीच्या मूल्यांकनात असा निष्कर्ष काढण्यात आला की, भारतात बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाला, अधिकाऱ्यांना किंवा समर्थकांना कोणताही विश्वसनीय आणि पडताळण्याजोगा सुरक्षा धोका नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!