Homeमनोरंजनभारत विरुद्ध न्यूझीलंड अभिषेक शर्माने 14 चेंडूत अर्धशतक ठोकून 10 षटकात सामना...

भारत विरुद्ध न्यूझीलंड अभिषेक शर्माने 14 चेंडूत अर्धशतक ठोकून 10 षटकात सामना जिंकला


भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा T20 जिंकला: स्टार भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. यावेळी त्याने इतिहासही रचला. डावखुऱ्या फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध अविश्वसनीय खेळी खेळत अवघ्या 14 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अभिषेकने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी करत पाच चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने केवळ 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तसंच या फॉरमॅटमध्ये एखाद्या भारतीयाने केलेले हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.

फक्त दोन चेंडूंमुळे हुकला मेंटॉर युवराजचा रेकॉर्ड

अभिषेकने आपल्या मेंटॉर युवराज सिंगपेक्षा केवळ दोन चेंडू जास्त खेळल्याने त्याचा रेकॉर्ड हुकला. युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता अभिषेकच्या नावावर एखाद्या भारतीयाने केलेले दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले गेले आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारतीयांनी केलेले सर्वात जलद अर्धशतक:

1) युवराज सिंग: 12 चेंडू
2) अभिषेक शर्मा: 14 चेंडू
३) हार्दिक पांड्या : १६ चिस्टल्स
4) अभिषेक शर्मा: 17 चेंडू
5) केएल राहुल: 18 चेंडू

भारताने 10 ओव्हरमध्ये जिंकला सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना रविवारी खेळवण्यात आला. भारतीय संघाने हा सामना आठ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकाही खिशात घातली. गुवाहाटी येथील बारासापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 154 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने फक्त 10 षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकले होते.

154 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याची विकेट घेतली. मात्र, त्यानंतर इशान किशन फॉर्ममध्ये होता. त्याने 13 चेंडूत 28 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चौथ्या षटकात किशनची विकेट पडली, परंतु तोपर्यंत टीम इंडियाचा स्कोअर 50 च्या पुढे गेला होता.

किशन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याने 14 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सातव्या षटकात भारताची धावसंख्या 100 च्या पुढे गेली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने फक्त 25 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि अवघ्या 10 षटकात भारताचा विजय निश्चित केला. सूर्याने 26 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या, तर अभिषेकने 20 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि पाच षटकार मारले. सूर्याने सहा चौकार आणि तीन षटकारही मारले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!