Homeदेश-विदेशभारतातील सर्वात जुनी नदी नर्मदा नदी नर्मदा जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

भारतातील सर्वात जुनी नदी नर्मदा नदी नर्मदा जयंतीचा इतिहास आणि महत्त्व


भारतातील सर्वात जुनी नदी: भारताची संस्कृती आणि इतिहासात डोकावलं असता अनेकदा काही भारावणारे संदर्भ डोळ्यांसमोर येतात आणि थक्क करून जातात. असेच संदर्भ देशातील नद्यांबाबतही आढळतात. नद्यांची उगमस्थानं इथपासून ते त्यांच्या उगमाच्या कथा अनेकदा विचार करायला भाग पाडतात, तर काही प्रसंदी आख्यायिकांच्या रंजकतेच्या बळावर खिळवून ठेवतात. देशातील अशाच एका जुन्या नदीबाबत इथं जाणून घेणार आहोत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ही आहे, भारतातील सर्वात प्राचीन अशी नर्मदा नदी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमीला या नदीचा उगम झाल्याचं म्हटलं जात असून, यंदा हा दिवस 25 जानेवारी 2026 रोजी असल्यानं या नदीच्या जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. ही नदी म्हणजे नर्मदा आणि हा दिवस म्हणजे नर्मदा जयंती. मध्य प्रदेशातील अमकंटक इथून उगम होणारी ही नदी मूळ उगमापासून 13000 किमी दूरपर्यंत वाहत जात तिचा प्रवाह पुढं खंबातच्या खाडीद्वारे सागराशी एकरुप होतो. हिंदूंसाठी नर्मदा 7 पवित्र नद्यांपैकी एक असून, ही भारतातील प्राचीन नदी आहे. इतकंच नव्हे तर असंही म्हटलं जातं की, नर्मदा ही गंगा नदीपेक्षा 5 पटींनी जुनी आहे.

नर्मदा नदी 25 कोटी वर्षे जुनी…

पुराणांपासून ते अगदी विज्ञानानंही नर्मदा नदीच्या आयुर्मानावर शिक्कामोर्तब केलं आहे. या नदीच्या उगमाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते जिथं या नदीचा उगम भगवान शंकराच्या घामातून झाल्याचं म्हटलं जातं. आणखी एका कथेनुसार भगवान शंकरानं नर्मदा नदीतील प्रत्येक खडकाला शंकराच्या रुपात पुजण्याचं वरदान दिल्यानं या नदीतील प्रत्येक दगड हा शिवलिंगाप्रमाणं पूजनीय ठरतो अशी धारणा आहे. धर्म- शास्त्रांनुसार या नदी ही 25 कोटी वर्षे जुनी असून, हिमालय पर्वत आणि गंगा नदी 3 ते 5 कोटी वर्षांपूर्वीची असल्याचं म्हटलं जातं.

नर्मदा नदीला 25 कोटी वर्षे झाल्याचं सांगण्यामागे आणखी एक तर्क असून, त्यामागचं कारण सांगण्यात येतं की नर्मदा नदीच्या पाण्याचे राजे आहेत मगर. याच मगरींचं अस्तित्वं पृथ्वीवर 25 कोटी वर्षांपासून आहे, गोड्या पाण्यातील या मगरी जगातील इतर मगरींपेक्षा वेगळं असल्याचंही सांगण्यात येतं.

काही वैज्ञानिक संदर्भांचा आधार घ्यायचा झाल्यास, नर्मदा नदीच्या खोऱ्याला जगातील काही प्राचीन नदी खोऱ्यांच्या श्रेणीत गणलं जातं. नर्मदा नदीमध्ये डायनासोरची अंडीसुद्धा सापडली असून, त्याशिवाय अनेक जीवांचे अवशेष आणि सापळे इथं सापडल्यानं ही नदी कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं. या नदीचं आणखी एक महत्त्वं म्हणजे देशातील बहुतांश मुख्य नद्या पश्चिमेपासून पूर्वेला बंगालच्या उपसागराच्या दिशेनं वाहतात. मात्र, नर्मदेचा प्रवाह उलट असून, ती पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत वाहते.

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24तास त्याची खातरजमा करत नाही. )





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!