शहरातील सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित केले आणि ते आपल्या प्रियकराला पाठवले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतात आणि गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात एकत्र राहत आहेत. १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद बोलत होती. “कसे वाटले फोटो आणि व्हिडिओ? हॉट आहेत का? असे ती विचारत असताना पीडितेने तिला रंगेहाथ पकडले. संशय बळावल्याने पीडितेने तिचा मोबाइल हिसकावून घेतला आणि पासवर्ड विचारून तपासणी केली. स्नॅपचॅटवर उघड झाला डाव पीडितेने मोबाइलमधील गॅलरी आणि स्नॅपचॅट तपासले असता तिला मोठा धक्का बसला. १८ जानेवारी रोजी ती खोलीत कपडे बदलत असताना आरोपी मैत्रिणीने तिचे चोरून चित्रीकरण केले होते. हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिने स्वराज धालगडे याला पाठवल्याचे स्पष्ट झाले. पीडितेचे धाडस आणि पोलिस कारवाई या मानसिक त्रासाला न जुमानता पीडितेने अत्यंत धाडसाने ही बाब वसतिगृहाच्या वॉर्डन आणि आपल्या पालकांना सांगितली. पालकांच्या पाठिंब्यानंतर तिने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. …अन् आत्महत्येची धमकी आपले पितळ उघड झाल्याचे लक्षात येताच आरोपी तरुणीने कांगावा सुरू केला. सुरुवातीला माफी मागणाऱ्या तरुणीने प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार असल्याचे समजताच पीडितेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. “जर तू तक्रार केलीस, तर मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईन आणि त्याला तूच जबाबदार असशील,’ अशी धमकी तिने पीडितेला दिली.
Source link
मैत्रिणीनेच मैत्रिणीचे व्हिडिओ काढून बाॅयफ्रेंडला पाठवले:संभाजीनगरच्या सिडकोतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























