HomeमनोरंजनRohit Sharma big statements on reverse his decision to retirement ahead of...

Rohit Sharma big statements on reverse his decision to retirement ahead of T20 World Cup 2026 | Rohit Sharma: रोहित शर्माच्या मनातलं न बोललेलं दु:ख; T20 निवृत्तीवर पुन्हा विचार? काय आहे खरी अपडेट?


रोहित शर्मा T20 विश्वचषक 2026 वर: टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026)च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमध्ये एक भावनिक चर्चा रंगू लागली आहे. T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रथमच रोहित शर्माने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. त्याच्या शब्दांतून एक सल जाणवते. ही सल म्हणजे विश्वचषक खेळता न येण्याचं दु:ख. त्यातूनच चाहत्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहतोय की, रोहित शर्मा आपला निर्णय बदलणार का?

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

विश्वविजयानंतर घेतलेला कठीण निर्णय

2024 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला. त्या विजयानंतर रोहित शर्माने या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचवेळी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही T20 ला अलविदा केल्याने भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा शेवट झाल्याची भावना निर्माण झाली.  या निर्णयानंतर अनेक चर्चा झाल्या जश्या की, संघातील बदल, पुढील नेतृत्व, आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य. आता, 2026 च्या T20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात होत असताना, रोहितच्या भावनिक वक्तव्याने पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.

“हा विश्वचषक वेगळा असेल…”

रोहित शर्माने स्पष्ट केलं की भारतासाठी T20 न खेळण्याचं दु:ख नाही, पण T20 विश्वचषकापासून दूर राहणं मात्र वेदनादायक आहे. तो म्हणाला, “मी जेव्हापासून T20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून प्रत्येक विश्वचषकात मी संघाचा भाग होतो. त्यामुळे यंदा घरातून सामने पाहणं माझ्यासाठी थोडं अजब असेल.”

सामान्य T20 सामने पाहताना वेगळी भावना नसते, पण विश्वचषकाचं वातावरण काहीसं वेगळंच असतं, असंही त्याने सांगितलं. यावेळी काही सामने तो स्टेडियममध्ये जाऊन पाहणार असल्याचंही रोहितने नमूद केलं.

आठवणी, भावना आणि भरून आलेला कंठ

विश्वचषकाच्या आठवणींबद्दल बोलताना रोहितचा कंठ दाटून आला. “यावेळी मी मैदानात नसेन, ही जाणीव मनाला लागते,” असं तो म्हणाला. प्रत्येक हंगामात मैदानात असलेला खेळाडू अचानक प्रेक्षक बनतो, तेव्हा ती भावना सहज पचणारी नसते हे त्याच्या शब्दांतून स्पष्ट होतं.

संघात संवाद महत्त्वाचा – रोहितचा ठाम मुद्दा

या चर्चेदरम्यान रोहित शर्माने संघातील संवाद आणि बॉन्डिंग यावर विशेष भर दिला. तो म्हणाला की खेळाडूंशी मोकळा संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मोहम्मद सिराजला वगळण्यात आलं होतं, तेव्हा मी व्यवस्थापनाशी बोललो. 2023 च्या विश्वचषकात युजवेंद्र चहलसोबतही अशीच परिस्थिती होती, असं त्याने उदाहरण देत सांगितलं.

“खेळाडू संघात असो किंवा नसो, त्याच्याशी संवाद तुटता कामा नये,” असं रोहित ठामपणे म्हणाला.

निवृत्तीचा निर्णय बदलणार का?

रोहित शर्माने थेट पुनरागमनाबाबत काहीही संकेत दिलेले नसले, तरी त्याच्या भावनिक वक्तव्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा निर्णय अंतिम आहे की परिस्थितीनुसार बदलू शकतो याचं उत्तर भविष्यात मिळेल. पण एक गोष्ट नक्की, T20 विश्वचषक आणि टीम इंडिया यांच्याशी रोहितचं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!