Homeमनोरंजनauto news बजाज पल्सर 125 मायलेज किंमत आणि वैशिष्ट्ये फोटो

auto news बजाज पल्सर 125 मायलेज किंमत आणि वैशिष्ट्ये फोटो


बजाज पल्सर 125 मायलेज किंमत आणि वैशिष्ट्ये: तिशीत आणि चाळीशीत असणाऱ्या अनेकांनाच त्यांच्या आवडीची बाईक विचारली तर काही कंपन्यांना या वर्गाची विशेष पसंती असल्याचं पाहायला मिळतं. अशा कंपन्यांमध्ये येणारं एक नाव म्हणजे, बजाज. अशा या Bajaj कंपनीनं पुन्हा एकदा आपहा ग्राहकवर्ग ओळखत त्यांची गाजलेली बाईक एका नव्या रुपात लाँच केली आहे. किंमत आणि मायलेजच्या बाबतीक ही बाईक हिरमोड करत नसल्यामुळं सध्या नव्यान दुचाकी खरेदी करण्याचा बेत असणाऱ्यांसाठी ही पर्वणी ठरू शकते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बजाजनंलाँच केलेली ही बाईक म्हणजे पल्सर 125. कंपनीच्या दाव्यानुसार पल्सर श्रेणीतील ही सर्वाधिक किफायतशीर बाईक असून, ज्यांना किमान खर्चात स्पोर्ट्स बाईकसारखा लूक असणारी मोटरसायकल घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे. या बाईकच्या सिंगल सीट वर्जनची एक्स शोरुम किंमत आहे 89,910 रुपये. तर, स्प्लिट सीट वर्जनची किंमत आहे 92,046 रुपये. हलकं फेसलिफ्ट असणारी ही बाईक जुनं इंजिन आणि मॅकेनिकल सेटअपसह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

इंजिन आणि इतर फिचर कसे आहेत?

2026 Pulsar 125 मध्ये कंपनीनं 124.4cc सिंगल-सिलेंडर इंजिन दिलं असून त्यातून 11.64 bhp पॉवर आणि 10.8 Nm इतका टॉर्क जनरेट होतो, ज्यासोबत 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतो. दैनंदिन वापरादरम्यान ही बाईक 50 ते 55 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. या बाईकला सस्पेंशन  म्हणून पुढील बाजूस टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस गॅस चार्ज्ड ट्विन शॉक एब्जॉर्बर देण्यात आले आहेत.

आधीच्या तुलनेत Pulsar 125 ही बाईक अधिक अपडेट झाली असून, यामध्ये फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. जिथं ब्लूटूथ कनेक्टिविटीसुद्धा मिळते. USB मुळं दैनंदिन प्रवासात ही बाईक एक चांगली साथ देते. या बाईकच्या लाईटिंग सिस्टीममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नवे एलईडी हेडलँप आणि एलईडी इंडिकेटर देण्यात आले आहेत. ज्यामुळं बाईकचा फ्रंट लूक अधिक मॉडर्न दिसत आहे. याशिवाय कंपनीनं रंग आणि ग्राफिक्समध्येही काही बदल केले असून, ही बाईक आता ब्लॅक ग्रे, ब्लॅक रेसिंग रेड, ब्लॅक सियान ब्लू आणि रेसिंग रेड विद टॅन बेज असे पर्याय मिळतात.

बजाजची ही बाईक देशभरातील बजाज डिलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध असून, ज्या खरेदीदारांना कमी किमतीत चांगलं मायलेज आणि स्पोर्टी लूक देणारी बाईक खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे असं म्हणणं गैर नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...
spot_img

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...
error: Content is protected !!