Homeमनोरंजनहिंदू धर्मीयांचा AI व्युत्पन्न व्हिडिओ शेअर केल्याबद्दल रिंकू सिंगविरुद्ध तक्रार दाखल

हिंदू धर्मीयांचा AI व्युत्पन्न व्हिडिओ शेअर केल्याबद्दल रिंकू सिंगविरुद्ध तक्रार दाखल


रिंकू सिंग एआय व्हिडिओ: सोशल मीडियावर सध्या एआय जनरेटेड अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र असाच एका व्हिडीओमुळे भारतीय फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) अडचणीत आलाय. भारतीय फलंदाजाने फेसबुकवर देवाचा एआय व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामुळे तो नवीन वादात सापडला आहे.  करणी सेनेने रिंकूविरुद्ध अलीगडमधील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये रिंकू सिंह हा मैदानावर जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय. या फोटोला कॅप्शन देताना रिंकू सिंहने लिहिले की, ‘तुला कोणी क्रिकेटर बनवले?’ या पुढील फुटेजमध्ये भगवान शिव, हनुमान, विष्णू आणि गणेश हे थारमध्ये बसलेले दिसतायत. या सर्व देतांना काळे चष्मे घातलेले असून स्वतः हनुमान गाडी चालवत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एक इंग्रजी गाणं वाजतंय.

व्हिडीओमुळे सोशल मीडियावर वाद :

रिंकू सिंहने शेअर केलेल्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर वाद सुरु आहे. काही लोक म्हणतात की रिंकू सिंहचा हेतू चांगला होता आणि असे व्हिडीओ शेअर करण्यात काहीही चूक नाही. तर काही लोकांचं म्हणणं आहे की हे धार्मिक भावनांशी छेडछाड करणारे कृत्य आहे. रिंकू सिंहचा हा व्हिडीओ व्हायरल होताच करणी सेनेनं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष सुमित तोमर यांनी कार्यकर्त्यांसह रविवारी सासनी गेट पोलिस स्टेशन गाठले आणि रिंकू सिंगविरुद्ध तक्रार दाखल केली. सुमित तोमर म्हणाले की, ‘रिंकू सिंगने शाहरुख खानप्रमाणेच त्याची ‘जिहादी’ मानसिकता दाखवली आहे’.

हा तर सनातन धर्माचा अपमान – सुमित तोमर :

करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित तोमर म्हणाले की, ‘रिंकू सिंग हा शाहरुख खानच्या आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. शाहरुखप्रमाणेच रिंकूनेही त्याची खरी मानसिकता उघड केली आहे. आपल्या देवाला काळे चष्मे लावायला लावणे, त्याला थारमध्ये गाडी चालवायला लावणे आणि त्याला इंग्रजी गाण्यांवर नाचताना दाखवणे हे श्रद्धेशी खेळणे आहे’.

हेही वाचा : सासू सुनेच्या भांडणाला कंटाळून क्रिकेटने जर्सीवरून हटवला नंबर, संपूर्ण वर्ल्ड कप नंबर नसलेली जर्सी घालून खेळला

पोलीस काय कारवाई करणार?

पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणाले की, ‘रिंकू सिंहने शेअर केलेल्या व्हिडिओची सत्यता तपासली जाईल, रणी सेनेने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर आणि तो पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाईल’.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
spot_img

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...
error: Content is protected !!