Homeमहाराष्ट्रमुंबईत शिवसेनेच्या महापौरपदासाठी 5 नावं चर्चेत, महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची पुन्हा एक खेळी...

मुंबईत शिवसेनेच्या महापौरपदासाठी 5 नावं चर्चेत, महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची पुन्हा एक खेळी मुंबई मुंबई नवीन BMC महापौर 2026


मुंबईचे नवीन बीएमसी महापौर 2026 : मागील 25 वर्षांपासून मुंबईत शिवसेनेचा महापौर आहे.  मुंबईत ठाकरेंना परभवाचा धक्का बसला आहे. 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेली. मुंबईत भाजप महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ठाकरेंची सत्ता गेली तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार आहे. भाजपच्या एका खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. 5 जणांची नावे मुंबईत महापौर पदासाठी चर्चेत आली आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  मुंबईत 227 पैकी 222 जागांवरचे निकाल जाहीर झाले आहेत.  मुंबईत महायुतीला ठाकरे बंधूंची कडवी झुंज ठाकरेंच्या शिवसेनेचा 64जागांवर विजय मिळवला. मनसे 6, काँग्रेस 24, एनसीपीला 3 जागा मुंबईत MIM 9, समाजवादी पार्टीला 2 जागा मिळाल्या आहेत. यामुळे मुंबईत महायुतीचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे.

मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि मराठीच असणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच भाजप महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात टाकणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असं नरेटीव्ह सेट करण्याची भाजपची खेळी आहे.  मुंबई पालिकेवर महायुतीचा मराठी महापौर बसणार अशी चर्चा रंगली आहे.  शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईत 28 जागांवर विजय मिळवला आहे.  मुंबईत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 88 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे भाजप महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेला देणार का याची उत्सुकता आता लागली आहे.  मुंबईत महापौर मराठी आणि हिंदूच असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  महाराष्ट्रात ‘ब्रँड’ म्हणून जर कोणी असेल तर तो एकच आहे – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही स्वतःला ब्रँड समजणे अयोग्य आहे. कोणीही स्वतःला ब्रँड समजू नये, असे मी ठामपणे सांगतो. आमच्या विकासाच्या अजेंडाला मताधिक्य मिळाले  असून मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असेही फडणवीस म्हणाले.

मुंबईत महापौर पदासाठी चर्चेत असलेली 5 नावं

1 तेजस्वी घोसाळकर

दहिसर (प्रभाग क्रमांक २) मधून 10,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झालेल्या तेजस्वी सध्या भाजपच्या सर्वात मोठ्या “पोस्टर गर्ल” आहेत. निवडणूका जाहीर झाल्यावर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला .

2. प्रकाश दरेकर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून प्रचंड विजय मिळवला. दरेकर कुटुंबाचा मुंबईतील, विशेषतः वायव्य मुंबईत मराठी मतपेढीवर मोठा प्रभाव आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव देखील आहे, ज्यामुळे ते महापौरपदासाठी एक मजबूत दावेदार म्हणून चर्चेत आहेत.

3. प्रभाकर शिंदे

बीएमसीमध्ये भाजप गटाचे माजी नेते प्रभाकर शिंदे हे पक्षाच्या सर्वात अनुभवी नगरसेवकांपैकी एक आहेत. त्यांना महापालिकेच्या कामकाजाची आणि नियमांची सखोल समज आहे. “मराठी चेहरा” आणि अनुभव असल्याने त्यांना महापौरपदासाठी सुरक्षित पर्याय मानले जाते.

4. मकरंद नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे दक्षिण मुंबईतील एक प्रमुख नाव आहे. ते सातत्याने जिंकत आहेत आणि कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड आहे. ते “मराठी” समुदायातून आले असले तरी त्यांची प्रतिमा आधुनिक आणि पुरोगामी नेत्याची आहे, ज्याचा फायदा भाजप घेऊ इच्छिते.

5 राजश्री शिरवाडकर

प्रभाग क्रमांक १७२ मधून विजयी झालेल्या राजश्री शिरवाडकर या भाजपच्या एक निष्ठावंत आणि आक्रमक मराठी महिला चेहरा आहेत. जर पक्षाने महिला महापौर (आरक्षणाच्या आधारे) करण्याचा निर्णय घेतला तर राजश्रीचे नाव आघाडीवर असेल. स्थानिक मुद्द्यांवर त्या खूप सक्रिय आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!