Homeमहाराष्ट्रअमोल बालवडकरांचा बाणेर-बालेवाडी प्रभाग 9 मधून विजय:पुण्यातील सर्वाधिक चर्चेतील जागेवर राष्ट्रवादीने भाजपला...

अमोल बालवडकरांचा बाणेर-बालेवाडी प्रभाग 9 मधून विजय:पुण्यातील सर्वाधिक चर्चेतील जागेवर राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला

पुणे महानगरपालिका निवडणुकीत बाणेर-बालेवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक नऊ सर्वाधिक चर्चेत होता. या बहुचर्चित जागेवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी ८०० मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. त्याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबुराव चांदोरे देखील भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांचा १४०० मतांनी पराभव करून जिंकून आले आहेत. या निवडणुकीत अमोल बालवडकर यांच्या उमेदवारीचा विषय महत्त्वाचा ठरला. मागील वेळी भाजपचे नगरसेवक असलेले बालवडकर यांचे ऐनवेळी पक्षाने तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यामुळे भाजपने हा प्रभाग प्रतिष्ठेचा करत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पुणे शहरात भाजपची एकहाती सत्ता येऊन भाजपचा महापौर होण्याची शक्यता असली तरी, स्मार्ट सिटीचा भाग असलेला बाणेर-बालेवाडी परिसर भाजपच्या हातून निसटल्याने पक्षाला त्याची सल कायम राहणार आहे. या विजयामुळे अमोल बालवडकर यांनी या भागातील आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अमोल बालवडकर यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोथरूड मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते आणि वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची तयारीही दर्शवली होती. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढत, आगामी मनपा निवडणुकीत महापौर किंवा स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिल्याचे बालवडकर यांनी म्हटले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दीड तास आधीपर्यंत त्यांना तिकीट मिळणार की नाही, याबाबत स्पष्ट संकेत न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही संधी हेरली आणि बालवडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली. प्रचाराची पहिली सभा देखील अजित पवारांनी बाणेरमध्ये घेतल्याने ही निवडणूक केवळ मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्यात प्रतिष्ठेची बनली होती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!