Homeमनोरंजनबांगलादेशच्या क्रिकेट खेळाडूंनी बीपीएलवर बहिष्कार टाकल्यानंतर बीसीबी संचालकांनी खेळाडूंना पुन्हा विरोध केला

बांगलादेशच्या क्रिकेट खेळाडूंनी बीपीएलवर बहिष्कार टाकल्यानंतर बीसीबी संचालकांनी खेळाडूंना पुन्हा विरोध केला


बांगलादेश क्रिकेट बोर्ड: बांगलादेश क्रिकेट सध्या अतिशय अडचणीत सापडलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (Bangladesh Cricket Board) डायरेक्टर एम. नजमुल इस्लाम (M. Najmul Islam) यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे खेळाडू नाराज झाले आहेत.  नजमुलमुळे बीसीबी आणि बांग्लादेशी खेळाडूंमध्ये गंभीर वाद पाहायला मिळतोय. खेळाडूंनी यानंतर एम. नजमुल इस्लाम याना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे आणि सोबतच क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टींवर सुद्धा बहिष्कार घातला आहे. यासगळ्यामुळे बीसीबी अडचणीत आलं असून एम. नजमुल इस्लाम यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बांगलादेश प्रीमियर लीगवर बहिष्कार:

बांगलादेशच्या खेळाडूंनी आधीच इशारा दिला आहे की जर नझमुल इस्लामला त्यांच्या पदावरून काढून टाकले नाही तर ते सर्व क्रिकेटशी संबंधित गोष्टींवर बहिष्कार टाकतील. आता खेळाडूंनी 15 जानेवारी रोजी बांग्लादेश प्रीमियर लीगमधील सामन्यावर बहिष्कार टाकला आणि ते स्ट्राईकवर गेले आहेत. बांगलादेश प्रीमियर लीगमधील नौखाली एक्सप्रेस विरुद्ध चट्टोग्राम रॉयल्स सामन्याचा टॉस देखील रद्द करण्यात आला. देशभरातील बहिष्कारामुळे दोन्ही संघ वेळेवर मैदानावर पोहोचू शकले नाहीत.

बीपीएल सामन्याची सुरुवात ही 1 वाजता होणार होती, पण स्थिती अनिश्चित झाली. मॅच रेफरी शिपर अहमद यांनी ESPNcricinfo ला सांगितले की, ‘आम्ही मैदानाच्या मध्यभागी उभे आहोत, पण आम्हाला काय चालले आहे याची काहीच कल्पना नाही. यावर BPL ची टेक्निकल टीम जास्त माहिती देऊ शकते. यापूर्वी, खेळाडूंच्या संपामुळे ढाका क्रिकेट लीग (DCL) मधील सामने देखील सुरू होऊ शकले नाहीत. क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ बांगलादेश (CWAB) ने बुधवारी रात्री खेळाडू या टी 20 लीगवर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला, जे गुरुवारी सकाळपासून लागू झालं.

हेही वाचा : WPL 2026 मध्ये अजब प्रकार! 130 च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या फलंदाजाला केलं रिटायर्ड आउट, नेमकं काय घडलं?

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीवर परिणाम :

बीसीबी ने एम. नजमुल इस्लामने खेळाडूंच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला. बीसीबीने प्रेस रिलीज जारी करत म्हटले की, ‘बोर्ड सदस्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानांबद्दल आम्हाला वाईट वाटते. बीसीबी व्यावसायिक क्रिकेट आणि खेळाडूंच्या प्रतिष्ठेला सर्वाधिक महत्त्व देते’. बोर्डाने सांगितले की, नझमुल इस्लामविरुद्ध औपचारिक शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि त्याला 48 तासांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या वादाचा टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीवर परिणाम होत आहे.

खेळाडू कोणत्या कारणामुळे नाराज?

बांगलादेशात हिंदूंवर वाढत असलेल्या अत्याचारांमुळे आयपीएल 2026 मधून बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेश क्रिकेटचा जळफळाट झाला आणि बांगलादेशने सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत पुढील महिन्यात होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. त्यांनी याबाबत आयसीसीकडे पात्र देखील पाठवलं होतं. ज्यामुळे परिस्थिती अजून कठीण झाली. मात्र या सगळ्या प्रकारावर बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आणि त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एम. नजमुल इस्लामने म्हंटले की, ‘खेळाडूंनी योग्य पाठिंबा न दिल्यामुळे त्यांना मोबदला दिला जाऊ नये’ यानंतर खेळाडूंच्या तक्रारींमध्ये आणखी वाढ झाली.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एम. नजमुल इस्लामने केलेल्या या वक्तव्याचा निषेध बांगलादेशच्या खेळाडूंनी केला आणि त्यांनी BPL सामन्यांवर बहिष्कार टाकला. तसेच क्रिकेटशी संबंधित कोणतीही गोष्ट न करण्याचे ठरवले. क्रिकेटर्स वेलफेयर एसोसिएशन ऑफ बांग्लादेशने एम. नजमुल इस्लाम यांच्या वक्तव्याची निंदा केली. खेळाडू आणि प्रशासन यांच्या सुरु असलेल्या वादामुळे आगामी टी २० वर्ल्ड कपच्या तोंडावर बांगलादेश क्रिकेटला संकटात टाकले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!