Homeमहाराष्ट्रkdmc elections 2026 exit poll shivsena bjp may comes in power again...

kdmc elections 2026 exit poll shivsena bjp may comes in power again | कल्याण- डोंबिवली महापालिकेवर पुन्हा भाजप


KDMC निवडणूक 2026 एक्झिट पोल : राज्यभरात गुरुवारी तब्बल 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. आता शुक्रवार 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार असून त्यापूर्वी जेडीएस आणि रूद्रा यांचे एक्सिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मतदार राजाचा कौल हा भाजप – शिवसेना महायुतीलाच मिळण्याची शक्यता आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कल्याण- डोंबिवलीत कोणी किती जागा लढवल्या?

कल्याण- डोंबिवलीत यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना – भाजप यांची युती होती तर शिवसेना UBT, मनसे यांची आघडी होती. कल्याण- डोंबिवलीत महापालिकेचे एकूण 122 प्रभाग आहेत. तर यात बहुमताचा आकडा हा 62 एवढा आहे. शिवसेना – भाजप युतीमध्ये सर्वाधिक 68 जागा या शिवसेनेने लढवल्या तर 54 जागा या भाजपने लढवल्या. तर शिवसेना UBT आणि मनसेने 71 जागा लढवल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने 64 जागा लढवल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे 28 तर ठाण्यात 268 उमेदवारांनी निवडणूक लढवली.

काय सांगतो एक्सिट पोल?

रूद्रा आणि जेडीएस यांचा कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकी संदर्भातला एक्सिट पोल समोर आलेला आहे. त्यानुसार कल्याण- डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या खालोखाल भाजपाला यश मिळेल. दोन्ही एक्सिट पोलनुसार कल्याण- डोंबिवलीत शिवसेना – भाजप युतीचाच भगवा फडकण्याची शक्यता आहे.

जेडीएसच्या एक्सिट पोलनुसार कल्याण- डोंबिवलीत शिवसेना 52-57 एवढ्या जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 44-48 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.  शिवसेना UBT ला 3-5 एवढ्या जागांवरच समाधान मानावं लागेल तर मनसे पक्षाला 1-2 जागा मिळतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. केडीएमसी निवडणुकीत अपक्षांना 2 ते 4 जागांवर यश मिळेल अशी शक्यता जेडीएसच्या एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : ठाण्यात दिघेंना जमलं नाही ते शिंदे करून दाखवणार? बालेकिल्ल्यात पुन्हा रेकॉर्डब्रेक जागा जिंकण्याचा अंदाज

रुद्राच्या एक्सिट पोलनुसार कल्याण- डोंबिवलीत शिवसेना  50-55 एवढ्या जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 45-50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.  शिवसेना UBT ला 10-15 एवढ्या जागांवरच समाधान मानावं लागेल तर मनसे पक्षाला 4-6 जागा मिळतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे.  केडीएमसी निवडणुकीत अपक्षांना 2 ते 5 जागांवर यश मिळेल अशी शक्यता रुद्राच्या एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 2015 निवडणुकांमध्ये पक्षीय बलाबल :

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेला 53 जागा, भाजपला 43, काँगेसला 4 राष्ट्रवादीला 2 मनसेला-9, बसपाला 1, एमआयएमला 1 आणि अपक्षला 9 जागा मिळाल्या होत्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!