HomeमनोरंजनTruth About Eating Potato Can Lead To Weight Gain | बटाटा खाल्याने...

Truth About Eating Potato Can Lead To Weight Gain | बटाटा खाल्याने वजन वाढते, हे मिथक आहे की सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या नेमके उत्तर


बटाटा खाल्ल्याने वजन वाढू शकते: आजकाल सर्वजण  आरोग्य आणि वजनाच्या बाबतील अधिक जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला एक चांगले आरोग्य आणि सिक्स पॅक अ‍ॅब्स हवे असतात. वजन कमी करण्यासाठी डाएटिंग सुरू करताना बरेचजण त्यांच्या आहारातून बटाटा पूर्णपणे वर्ज करतात. कारण त्यांच्या मते बटाटा खाल्याने वजन अधिक वाढते. काहीवेळेला आई सुद्धा म्हणते “जास्त बटाटा खाऊ नकोस, नाहीतर बटाट्यासारखी जाड होशील!”. तसेच मधुमेहाची समस्या असलेले व्यक्तीही बटाटा खाल्यास रक्तातील साखर वाढेल  या भीतीने बटाटा खाणे टाळतात. पण खरंच बटाटा खाल्याने वजन किंवा रक्ताताली साखर वाढते? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेल. चला तर मग तुमच्या या आणि यांसारख्या अनेक प्रश्नाचे नेमके उत्तर आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बटाट्यामध्ये फक्त कॅलरीज असतात का?

कोणत्याही भाजीत बटाटा वापरला तरी तो चविष्टच लागतो. ‘आज कोणती भाजी बनवायची?’ या प्रश्नाचा खोल विचार केला तरी, शेवटचा पर्याय म्हणून ताटात बटाट्याची भाजीच वाढली जाते. बऱ्याचदा असेल मानले जाते की, बटाट्यात कोणतेही पौष्टिक गुणधर्म नसतात. पण तज्ज्ञ सागंतात की, मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. खरे तर, बटाट्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फायबर असते आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात. बटाट्यात विटॅमिन सी, बी6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. म्हणजेच बटाट्यात फक्त कार्ब्स किंवा स्टार्च नाही तर, अनेक पौष्टिक घटकही असतात.

बटाटा खाल्याने वजन वाढते का?

बटाटा खाल्याने वजन वाढते हे की नाही,  हे बटाट्याच्या शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. बजारात बटाट्यापासून बनलेले अनेक पदार्थ उपलब्ध असतात. बटाटा वापरून फ्रेंच फ्राइज, कटलेट, बटाटा वडा असे अनेक तेलकट जंक फूड बनवले जातात. हे सर्व पदार्थ डिप फ्राय केले जातात. त्यामुळे त्यात कॅलरी आणि निरोगी फॅटचे प्रमाण वाढते. पण तोच बटाटा जर तुम्ही उकडवून, भाजून किंवा ग्रील करून खाल्ला तर, त्यातील कॅलरीजचे प्रमाण आहे तेवढेच राहते. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते तुमचे वजन बटाटा खाल्याने नाही तर, चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे वाढते.

मधुमेहाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी बटाटा खाणे टाळावे का?

बटाट्यात रक्तातील साखर वाढवणारे ग्लाइसेमिक इेंडेक्स असते. पण बटाटा उकडवल्याने त्यातील स्टार्चचे रूपांतर रेसिस्टेंट स्टार्चमध्ये होते. जे शरीरासाठी फायबर प्रमाणे काम करते.  ज्यामुळे रक्तातील साखर जलद गतीने वाढत नाही. तसेच प्रोटीन आणि फायबर असलेल्या भाज्यांसह बटाटा खाल्ला तर शुगर स्पाइक होण्याची  शक्यता कमी होते. जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.

बटाट्यामध्ये असलेले कार्ब्स आरोग्यासाठी फायदेशीर नसतात का?

बऱ्याचवेळा वजन कमी करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारातून कार्ब्स पूर्णपणे वर्ज करतात. पण तज्ज्ञांच्या मते आहारातून कार्ब्स पूर्णपणे काढून टाकल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते. असे केल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळणार नाही. ज्यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बटाट्यामध्ये असलेले कॉम्पलेक्स कार्ब्स आणि फायबर शरीराला ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात. लंडन आणि अमेरिकेतही लोक अनेकवेळा सकाळच्या नाश्त्यात उकडलेला बटाटा आणि ब्रेड खाणे पसंत करतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!