HomeमनोरंजनBookMyShow crashes within minutes after IND vs PAK match sale opens due...

BookMyShow crashes within minutes after IND vs PAK match sale opens due to crazy demand for T20 World Cup clash | भारत-पाकिस्तान टी-20 विश्वचषक सामन्याची तिकिट विक्री सुरू होताच गोंधळ! BookMyShow काही सेकंदात क्रॅश


IND vs PAK सेल उघडल्यानंतर काही मिनिटांत BookMyShow क्रॅश होतो: भारत-पाकिस्तान टी20 वर्ल्ड कप सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू होताच प्रचंड गोंधळ उडाला. तिकिटांसाठी चाहत्यांची एवढी गर्दी झाली की ऑनलाइन तिकिटिंग प्लॅटफॉर्म BookMyShowची वेबसाइट काही वेळातच ठप्प झाली. बुधवारी तिकिट विक्रीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच लाखो क्रिकेटप्रेमींनी एकाच वेळी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. अचानक वाढलेल्या ट्रॅफिकमुळे सर्व्हरवर ताण आला आणि वेबसाइट क्रॅश झाली. परिणामी अनेक युजर्सना लॉगिन होत नव्हते, पेज लोड होत नव्हते किंवा पेमेंट अर्धवट अडकत होते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

15 फेब्रुवारी होणार सामना!

हा बहुचर्चित सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे खेळवला जाणार असून, भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे नेहमीच हाय-व्होल्टेज ड्रामा असतो. त्यामुळेच तिकिटांसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तिकिटे उपलब्ध होताच चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी धाव घेतली.

सोशल मीडियावर  चाहत्यांची नाराजी व्यक्त

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी आपल्या अडचणी शेअर केल्या. काहींना बराच वेळ वेटिंग क्यूमध्ये थांबवण्यात आले, तर काहींच्या खात्यातून पैसे वजा झाले पण तिकीट कन्फर्म झाले नाही. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. BookMyShowशी संबंधित एका सूत्राने PTIला सांगितले की, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लॉगिन आणि ट्रान्झॅक्शन रिक्वेस्ट आल्याने सिस्टमवर ताण आला आणि वेबसाइट क्रॅश झाली. कंपनीने नंतर ‘X’ (माजी ट्विटर) वरून याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.

सर्वात मोठा सामना

भारत-पाकिस्तान सामना हा टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा आणि चर्चेचा सामना मानला जातो. दोन्ही देशांमधील जुनी क्रिकेट प्रतिस्पर्धा आणि चाहत्यांचा प्रचंड उत्साह यामुळे तिकिटांची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. लवकरच तांत्रिक अडचणी दूर करून तिकिट विक्री पुन्हा सुरू केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्येही ‘नो हँडशेक’ धोरण?

टी20 वर्ल्ड कपमध्येही ‘नो हँडशेक’ धोरण कायम राहण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये जशी खेळाडूंमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले होते, तसाच कटुतेचा सूर या स्पर्धेतही कायम राहू शकतो. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच भावनिक आणि तीव्र असतो, त्यामुळे यावेळीही मैदानावर वातावरण तापलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज लढतीसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दोन्ही संघ आमनेसामने येणार असल्याने सामना केवळ खेळापुरता मर्यादित न राहता मानसिक आणि भावनिक पातळीवरही महत्त्वाचा ठरणार आहे.

स्पर्धेतील लीग टप्प्यातील पाकिस्तानचा हा तिसरा सामना असेल. त्याआधी ते स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरतील, त्यानंतर अमेरिकेविरुद्ध लढत होईल. विशेष म्हणजे, 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला स्पर्धेबाहेर ढकलले होते, त्यामुळे हा सामना पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे.

भारताबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघ 7 फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील पहिल्याच दिवशी अमेरिकेविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध सामना खेळला जाईल. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष असलेला भारत-पाकिस्तान सामना क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!