IND VS NZ दुसरी वनडे : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून 7 विकेट गमावून 284 धावा केल्या. तसेच न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट न्यूझीलंडने 7 विकेट राखून पूर्ण केलं. यामुळे आता न्यूझीलंडने सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली असून आता रविवारी होणारा वनडे सामना सीरिज विजयासाठी दोन्ही संघां करता महत्वाचा असणार आहे. टीम इंडियाच्या (Team India) या पराभवाला संघातील एक खेळाडू कारणीभूत ठरल्याचं बोललं जातंय, कारण त्याच्या एका चुकीमुळे या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजाला जीवदान मिळालं आणि त्यानेच पुढे भारताविरुद्ध नाबाद शतक ठोकलं आणि सामना जिंकवून दिला.
राजकोटच्या स्टेडियमवर बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सिरीजमधील दुसऱ्या सामन्याचा टॉस हा न्यूझीलंडने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाकडून फलंदाजी करताना केएल राहुलने शतक ठोकलं. त्याने 92 बॉलमध्ये नाबाद 112 धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील आठवं शतक ठोकलं. तर शुभमन गिलने 56, रोहित शर्माने 24, विराट कोहलीने 23, रवींद्र जडेजाने 27, नितीश कुमार रेड्डीने 20 धावा केल्या. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून 7 विकेट गमावून 284 धावा केल्या. तसेच न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं टार्गेट दिलं होतं.
न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं टार्गेट मिळाल्यावर त्यांच्या फलंदाजांनी मैदानात दमदार कामगिरी केली. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी खराब झाली कारण त्यांचे सलामीवीर फलंदाज देवोन कॉनवेने 16, हेनरी निकोलसने 10 धावा केल्या. मात्र त्यानंतर विल यंगने 87 धावांची खेळी केली. त्यानंतर डॅरिल मिशेलने मैदानात वादळ आणलं. त्याने 117 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 षटकार ठोकून 131 धावांची खेळी केली. दरम्यान फॉर्मात असलेल्या डॅरिल मिशेलला बाद करण्याची नामी संधी टीम इंडियाकडे चालून आली होती. मात्र गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या एका चुकीमुळे ही संधी हुकली.
हेही वाचा : केएल राहुलने न्यूझीलंड विरुद्ध ठोकलं शतक, MS Dhoni चा ‘हा’ रेकॉर्ड केला उध्वस्त
प्रसिध कृष्णाने सोडलेला सोपा झेल.
खेळ फिरवण्याची मोठी संधी हुकली.#INDvNZ #INDvsNZ pic.twitter.com/WSAkkilzzv
नेमकं काय झालं?
285 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने 35 ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट गमावत 200 धावांच्या जवळ पोहोचले. डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी आधीच शतकी भागीदारी केली होती. दोन्ही फलंदाज अर्धशतकांपर्यंत वेगाने धावत होते आणि विजयाच्या मार्गावर होते. भारत विकेटच्या शोधात होता. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णाने एक चूक केली. इनिंगच्या 36 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर प्रसिद्धने एक सोपा कॅच सोडला. तो कॅच डॅरिल मिशेलचा होता. कुलदीप यादवच्या चौथ्या बॉलवर मिशेलने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल हवेत गेला. धावत असताना, प्रसिद्धच्या हातातून बॉल निसटला. त्यावेळी मिशेल 83 धावांवर फलंदाजी करत होता. जर भारताला ही विकेट मिळाली असती तर ते सामन्यात पुनरागमन करू शकले असते, कारण मिशेलने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि प्रथम शतक आणि नंतर नाबाद 131 धावा करून भारताला विजय मिळवून दिला.
भारताची प्लेइंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
न्यूझीलंडची प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाकरी फाॅल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स































