Homeसांस्कृतिकMakar Sankranti 2026: 23 Years Later Ekadashi Coincidence, Sun Enters Capricorn at...

Makar Sankranti 2026: 23 Years Later Ekadashi Coincidence, Sun Enters Capricorn at 3:06 PM | 23 वर्षांनंतर दुर्मिळ योग!: मकरसंक्रांत-एकादशी एकत्र; 14 जानेवारीला दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश


गिरीश काळेकर | छत्रपती संभाजीनगर‎3 तासांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

यंदा २३ वर्षांनंतर मकरसंक्रांत आणि एकादशी‎ एकाच दिवशी आली आहे. १४ जानेवारीला‎ दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्य मकर राशीत‎ प्रवेश करणार आहे. यंदा २८ दिवसांची नाही,‎ तर फक्त १२ दिवसांची संक्रांत असणार आहे.‎ त्यासाठी महिलांची तयारी सुरू झाली आहे.‎बाजारात वाण, काळ्या रंगाच्या साड्या, शून्य‎ वयापासूनच्या मुलींचे कपडे सोशल‎ मीडियावर ट्रेंड करत आहेत. मकरसंक्रांत हा‎ सण पूर्णतः सूर्य संक्रमणावर आधारित आहे. तो ‎रथसप्तमीपर्यंत चालतो. त्यामुळे महिलांना हा‎सण धावपळीचा ठरणार आहे.

संक्रांत देवीचे वाहन वाघ आहे. उपवाहन‎ घोडा आहे. देवीने पिवळे वस्त्र परिधान केले‎आहे. हातामध्ये गदा आहे. अंगाला केशराचा‎गंध आहे. गळ्यात मोत्यांची माळ धारण केली‎आहे. देवी कुमारी, बसलेल्या अवस्थेत आहे.‎हातात जाईचे फूल आहे. अन्न म्हणून पायसाचे‎भक्षण करत आहे. ही संक्रांती पूर्वेकडून ‎पश्चिमेकडे प्रवास करून वायव्य दिशेकडे‎दृष्टिक्षेप टाकत आहे. संक्रांतीचे नक्षत्र व वार‎नाव मंदाकिनी आहे. याचा प्रभाव २७ नक्षत्रांवर‎ होतो. त्यामुळे प्रवासयोग, सुखवस्तूंची प्राप्ती, ‎‎मानसिक त्रास, वस्त्रप्राप्तीचे योग, फसवणूक ‎व नुकसान, धनप्राप्तीचे योग बनत आहेत.‎

मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर राशीनुसार दान आणि त्याचे फळ‎ जाळी: सुवर्ण-आर्थिक भरभराट‎ वृषभ: पांढरे वस्त्र- मानसिक‎स्वास्थ्य लाभेल.‎ मिथुन: गाईला हिरवा चारा-‎व्यवसाय-नोकरीत वृद्धी‎ कर्करोग: दही, पोहे- लौकिकता,‎प्रसिद्धी प्राप्त होईल.‎ सिंह: लाल कपडे – चांगले आरोग्य कन्या आणि तूळ : अन्नदान,‎नवीन भांडे -मनोबल वाढेल.‎संततीविषयक चिंता मिटतील.‎ वृश्चिक : गूळ- कौटुंबिक सौख्य‎लाभेल.‎ धनू : पिवळे वस्त्र व गूळ- नवीन‎नोकरी आणि व्यवसायात संधी.‎ मकर : तीळ -लौकिकता,‎प्रसिद्धी व धनवृद्धी प्राप्त होईल.‎ कुंभ : तीळ व गूळ-आध्यात्मिक‎क्षेत्रात प्रगती, मनोबल वाढेल‎ मीन- सुवर्ण व तीळ पात्र-धनवृद्धी,‎वास्तू योग प्राप्त होईल.‎

षट‌्तिला एकादशीला सहा प्रकारे करा तिळाचा उपयोग‎

१. तिलोदकी स्नान‎: अंघोळीच्या पाण्यात‎तीळ टाकून स्नान‎ करणे.‎ २. तिलोद्वर्तन :‎शरीराला तिळाचे‎ उटणे लावणे.‎ ३. तीळहवन :‎अग्नीमध्ये तिळाची‎आहुती देणे.‎ ४. तिलोदक :‎पितरांना तीळ मिश्रित‎ पाणी अर्पण करणे ‎(तर्पण).‎ ५. तीळभक्षण :‎अन्नरूपात तीळ‎ खाणे.‎ ६. तीळदान :‎गरजूंना तिळाचे दान‎ करणे.‎

यंदा दुर्मिळ योग; पुन्हा २०४५ ला येईल असा योग‎

मकरसंक्रांत १४ किंवा १५‎ जानेवारीला येते. एकाच दिवशी‎एकादशी, मक रसंक्रांत येण्याचा ‎योग दुर्मिळ आहे. १४ जानेवारी‎ १९८५ साली, १४ जानेवारी‎ २००३, १५ जानेवारी २००४, १४‎ जानेवारी २०२६, १४ जानेवारी‎ २०४५ येईल.‎

काळे कपडे घालण्यास‎ शास्त्रीय आधार नाही‎- अनंत पांडव, वेदमूर्ती‎

‎संक्रांतदेवी जे‎‎वस्त्र परिधान करते‎‎ते पदार्थ महाग‎‎ होतात, असा ‎‎लोकसमज आहे.‎‎ किंवा काळी वस्त्रे‎ परिधान करतात. यालाही शास्त्रीय‎ आधार नाही. परंतु शास्त्रात सूर्य‎मकर राशीत प्रवेश करताना सूर्याची‎पत्नी छाया काळे वस्त्र परिधान करते. ‎याचे प्रतीक म्हणून नवविवाहित ‎महिला काळे वस्त्र परिधान करतात.‎



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!