Homeदेश-विदेशमहाराष्ट्र हवामान बातम्या 8 जानेवारी 2026 आयएमडीने 29 शहरांमध्ये थंड लाटेचा इशारा...

महाराष्ट्र हवामान बातम्या 8 जानेवारी 2026 आयएमडीने 29 शहरांमध्ये थंड लाटेचा इशारा जारी केला 3 राज्यांमध्ये पावसाचा इशारा मुंबई विदर्भ मराठवाडा हिमाचल उत्तराखंड काश्मीर तामिळनाडू

महाराष्ट्र हवामान बातम्या: महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळं राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसाळी आणि काहीसं दमट हवामान पाहायला मिळालं, तर विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव सर्वाधिक दिसून आला. पुढील 24 तासांसाठी हा अंदाज कायम असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. असं असलं तरीही राज्यात तापमानात चढ- उतार अपेक्षित असून, मुंबई शहरात तापमान काहीसं उन्हाळ्याची जाणीवच करुन देणारं असेल. पहाटेची वेळ मात्र यास अपवादत ठरेल. कोकणातही काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळेल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरात सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर असेल, ज्यामुळं दृश्यमानता प्रभावित होईल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हीच स्थिती असेल. यादरम्यान कमाल आणि किमान सरासरी तापमान अनुक्रमे 32 अंश ते 19 अंश सेल्सिअस इतकं असेल. मागील 24 तासांमध्ये नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, ज्यामुळं इथं पहाटेच्या वेळी धुकं आणि दवबिंदू दिसून आले. तर, हवेत गारवा जाणवला. असं असलं तरीही या पावसाळी क्रियेमुळं राज्यात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊ शकते असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. थोडक्यात राज्यात थंडीची लाट नसली तरीही गारठा मात्र कायम असेल आणि दुपारच्या वेळी मात्र सूर्याचा दाह सोसेनासा होईल. तर कुठं बोचरे वारे पाठ सोडणार नाहीत.

दक्षिणेकडील राज्यांना पावसाचा इशारा…

केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं देशातील 3 राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये दक्षिणेकडे येणाऱ्या तामिनळनाडू, केरळ आणि अंदमान- निकोबार बेट समुह यांचा समावेळ आहे. इथं किनारपट्टी क्षेत्रात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून पाऊस कोसळण्याच्या अंदाज असल्यानं मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर भारतात 29 शहरांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा…

हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात 8 जानेवारीला 29 शहरांना थंडीच्या भीषण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात अयोध्या, प्रयागराज, बिजनौर, झांसी, कानपुर, लखनऊ, रायबरेली, अमेठी, आगरा, अलीगढ़, टुंडला , गौतम बुद्ध नगर इथं थंडीची लाट आणखी तीव्र असेल. उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा असेल. ज्यामुळं मैदानी भागांमध्ये पारा घसरू शकतो. प्रामुख्यानं चमोली, पिथौरागढ़, नैनीताल, बागेश्वर आणि रुद्र प्रयाग इथं थंडीचा कडाका वाढेल. हिमाचलही यास अपवाद नसून, ताबो, कल्पा, मनाली, लाहौल, स्पितीचं खोरं, अटल टनल, रोहतांग, कोकसर इथं जोरदार बर्फवृष्टीचा इशारा आहे, काश्मीरच्या खोऱ्यातही पारा उणे 2 ते 3 अंशांवर जाईल. ज्यामुळं इथं स्थानिकांसह या राज्यांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!