Homeदेश-विदेशबांगलादेशात हिंदू विधवा महिलांवर २ पुरुषांनी बलात्कार केला आणि नंतर तिला झाडाला...

बांगलादेशात हिंदू विधवा महिलांवर २ पुरुषांनी बलात्कार केला आणि नंतर तिला झाडाला बांधून केस कापले

बांगलादेशात हिंदू महिलेवर शारीरिक अत्याचार बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंदूंवर अत्याचार सुरु असून, यामुळे दोन्ही देशात राजकीय तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर उमटताना दिसत आहेत. यादरम्यान आता बांगलादेशात 40 वर्षीय हिंदू महिलेवर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांनी तिला झाडाला बांधून तिचे केसही कापले. मध्यवर्ती भागातील झेनैदा जिल्ह्यातील कालिगंज उप-जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महिलेने आरोपी शाहिन आणि त्याच्या भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की अडीच वर्षांपूर्वी तिने कालिगंज नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये शाहिन आणि त्याच्या भावाकडून 20 लाख टका देऊन तीन डेसिमल जमीन आणि एक दुमजली घर खरेदी केलं होते. त्यानंतर, शाहिनने तिला अश्लील प्रस्ताव देण्यास सुरुवात केली आणि तिने नकार दिल्यावर तो तिला त्रास देऊ लागला.

शनिवारी संध्याकाळी, विधवा महिलेच्या गावातील दोन नातेवाईक तिला भेटायला आले होते. त्याचवेळी शाहिन आणि त्याचा साथीदार हसन जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे 50 हजार टका (सुमारे 37 हजार रुपये) मागितले. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी कथितरित्या त्या नातेवाईकांना मारहाण करून हाकलून दिले. महिला ओरडू लागल्यावर, त्यांनी तिला एका झाडाला बांधलं आणि तिचे केस कापले. इतकंच नाही तर त्यांनी कॅमेऱ्यात हे सगळं रेकॉर्ड केलं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज केला.

त्यांनी त्या विधवा महिलेचा छळही केला आणि त्यामुळे ती बेशुद्ध पडली. स्थानिक रहिवाशांनी तिची सुटका केली आणि तिला झेनैदाह सदर रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोहम्मद मुस्तफिजुर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सुरुवातीला डॉक्टरांना काय घडले हे सांगितले नाही. नंतर, वैद्यकीय तपासणीद्वारे त्यांना की तिच्यावर अत्याचार झाल्याचं समजलं. त्यानंतर महिलेने शाहिन आणि हसन यांची नावे घेत कालीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

झिनाइदहचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बिलाल हुसेन म्हणाले, “आम्ही पीडित महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून तिची तक्रार नोंदवून घेतली आहे. तपासानंतर पोलीस शक्य ती कठोर कायदेशीर कारवाई करतील.”

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!