Homeदेश-विदेशराजकारणातील वर्ष 2026 हे भारताच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या निवडणुकांचे स्पष्टीकरण

राजकारणातील वर्ष 2026 हे भारताच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या निवडणुकांचे स्पष्टीकरण

राजकारणातील वर्ष 2026 भारतातील महत्त्वाच्या निवडणुका: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात महापालिका निवडणुकींचा धुरळा उडला असून पहिल्या महिन्यातच राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. या निवडणुकांपाठोपाठ जिल्हापरिषदेच्या निवडणुकाही पार पडणार आहे. मात्र 2026 हे वर्ष केवळ महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण वर्षभर देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. हे वर्ष एवढं महत्त्वचं का असणार आहे हे जाणून घेऊयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका

2026 हे वर्ष भारताच्या राजकीय दृष्टीने खूप महत्त्वाचे असण्याचं प्रमुख कारण म्हणजे या वर्षभरात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. संसदीय निवडणुकांबरोबरच देशात काही अंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

कोणकोणत्या राज्यांमध्ये या वर्षी होणार विधानसभा निवडणुका

2026 मध्ये पाच राज्यांबरोबरच एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि विरोधकांसाठी अत्यंत निर्णायक ठरु शकतात. त्यातही पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

आसाम विधानसभा निवडणूक: ईशान्येकडील या राज्यात विद्यमान भाजप सरकारसाठी विरोधक मोठं आवाहन निर्माण करतील असं चित्र दिसत आहे.
केरळ विधानसभा निवडणूक: एलडीएफ आणि युडीएफ यांच्यातील स्पर्धा दक्षिणेकडील राज्यात पाहायला मिळणार आहे.
पुदुचेरी विधानसभा निवडणूक: ज्या एकमेव केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणूक होणार आहे तो हाच प्रदेश.
तमिळनाडू विधानसभा निवडणूक: डीएमके-काँग्रेस आघाडीची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. भाजपा या ठिकाणी आव्हान देण्याच्या प्रयत्नात असणार हे नक्की.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता असून यांचा देशाच्या राजकीय वातावरणावर मोठा परिणाम होईल असं दिसत आहे.

राज्यसभा द्विवार्षिक निवडणुका

2026 मध्ये राज्यसभेच्या 75 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अप्रत्यक्षपणे होतात. संसदेतील पक्षीय संतुलन या निवडणुकींमुळे बदलू शकतात. यामुळे केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या शक्तीवर परिणाम होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा

भारतात 18 वी ‘ब्रिक्स’ शिखर परिषद याच वर्षी पार पडणार आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि नवीन सदस्यांसह चर्चा होणार आहे. याचप्रमाणे भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदही भारतात पार पडणार आहे. या परिषदेतून आफ्रिकन देशांसोबत भारताचे संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!