Homeदेश-विदेशZomato Swiggy आणि इतर डिलिव्हरी कामगारांनी 31 डिसेंबर रोजी संप पुकारला

Zomato Swiggy आणि इतर डिलिव्हरी कामगारांनी 31 डिसेंबर रोजी संप पुकारला

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म डिलिव्हरी कामगारांनी 31 डिसेंबर रोजी संप पुकारला: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही काही प्लॅन आखला असेल आणि त्यात ऑनलाइन ऑर्डर करण्याची योजना आखली असेस तर तुमच्या उत्साहावर विरजण येऊ शकतं. याचं कारण झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आणि ॲमेझॉनसह प्रमुख प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ज्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या उत्सवावर परिणाम होऊ शकतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन (TGPWU) आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) या संपाचे नेतृत्व करणार आहेत. या संपाला महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या काही भागांतील प्लॅटफॉर्म कामगार संघटनांसह अनेक प्रादेशिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

31 डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांचा संप: कशावर परिणाम होईल?

हा नियोजित संप नवीन वर्षाच्या एक दिवस आधी होत आहे, ज्यात फूड डिलिव्हरी, क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील एक लाखांहून अधिक डिलिव्हरी कामगार ॲप्समधून लॉग आउट करतील किंवा त्यांचे काम लक्षणीयरीत्या कमी करण्याची शक्यता आहे. साधारणपणे, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान ऑनलाइन ऑर्डरचे प्रमाण वाढते. या काळात लोक घरांमध्ये सेलिब्रेशन करत असल्याने वेगाने डिलिव्हरीची मागणी असते.

या सेलिब्रेशनदरम्यान खाण्याच्या ऑर्डर, किराणा मालाची डिलिव्हरी आणि शेवटच्या क्षणीच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. पुणे, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांसह अनेक टियर-२ बाजारपेठांवर याचा परिणाम होईल.

डिलीव्हरी कर्मचारी देशव्यापी संपावर का आहेत?

जलद डिलिव्हरीची मागणी वाढली असतानाही, गिग इकॉनॉमीमधील कामाची परिस्थिती सतत बिघडत चालली आहे, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. कंपन्या परिस्थिती सुधारत नाहीत, ज्यामुळे कामगारांसाठी परिस्थिती आणखीच बिकट होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

कामगार नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या जलद वाणिज्य म्हणजेच क्विक कॉमर्स व्यवसायामुळे कामगारांना चांगला पगार, नोकरीची सुरक्षा किंवा सुरक्षित कामाची परिस्थिती मिळालेली नाही. तसेच, कंपन्या वेगाला आणि ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य देतात, तर कामगारांना कामाचा बोजा आणि कमी कमाईचा सामना करावा लागतो. एका कामगार नेत्याने दावा केला की, जेव्हा जेव्हा डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, तेव्हा या प्लॅटफॉर्म कंपन्यांनी एकतर त्यांचे आयडी ब्लॉक केले आहेत किंवा पोलीस तक्रारींची धमकी देणे, भीती दाखवणे आणि अल्गोरिदमद्वारे शिक्षा देणे असे प्रकार केले आहेत.

यापूर्वी, 25 डिसेंबर रोजी गिग कामगारांनी संप पुकारला होता, ज्यात जवळपास 40 हजार डिलिव्हरी कर्मतारी सहभागी झाले होते. यामुळे अनेक शहरांमध्ये डिलिव्हरीमध्ये 60 टक्के परिणाम झाला होता.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!