Homeदेश-विदेशएका सिगारेटची किंमत ७२ रुपये असेल लवकरच सोशल मीडियावर पोस्ट करा

एका सिगारेटची किंमत ७२ रुपये असेल लवकरच सोशल मीडियावर पोस्ट करा

एका सिगारेटची किंमत ७२ रुपये सिगारेट पिणं आता महागणार आहे. सरकारने यासंदर्भात नवीन कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या नव्या कायद्यामुळे सिगारेटवरील एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 18 रुपयांना मिळणारी सिगारेट 72 रुपयांना मिळणार आहे. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. किंमत वाढवल्याने तरी लोक धूम्रपान सोडतील अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे. मात्र काहींनी व्यसनी लोक कितीही किंमत वाढवली तरी सिगारेट सोडणार नाही असं म्हटलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

‘रेडीट’वरील एका युझरने एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये लवकरच सिगारेटची किंमत वाढणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. या व्यक्तीने यामुळे तरी माझी सिगारेटची सवय कमी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. स्वत: धूम्रपान करत असूनही या व्यक्तीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “मी स्वत: धूम्रपान करणारा असूनही मी मला हा निर्णय आवडला आहे,” अशी कॅप्शन या व्यक्तीने दिली आहे. “यामुळे भारतामधील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी मी अपेक्षा करतो. खास करुन तरुण वर्ग आणि् विद्यार्थ्यांमधील धूम्रपान याने कमी होईल अशी अपेक्षा आहे. मी सुद्धा कदाचित यामुळे सिगारेट सोडेन,” असं या व्यक्तीने म्हटलंय.

आम्हाला काय? आम्ही तर दिल्लीत राहतो

अनेकांनी या पोस्टवर मजेदार आणि उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवल्यात. दिल्लीतील वायू प्रदुषणाचा संदर्भ देत, “मला काय मी तर दिल्लीतील हवामानात जगतोय. ते ही फ्री, फ्री, फ्री!” असं म्हटलं आहे. दिल्लीतील हवा इतकी प्रदुषित आहे की केवळ श्वास घेणं म्हणजे धूम्रपान करण्यासारखं आहे, असं या व्यक्तीला अधोरेखित करायचं आहे. अनेकांनी आता लोक इलेक्ट्रीक सिगारेट वापरतील असं म्हटलं आहे.

अधिक धोकादायक पर्याय होतील निर्माण

काहींनी अशाप्रकारे सिगारेटची किंमत वाढवल्याने काळ्या बाजारामधून होणारी विक्री वाढेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. “याने गुंतागुंत अजून वाढेल. अनेक बनावट आणि तितकेच घातक पर्याय निर्माण केले जातील. जे आरोग्यासाठी अधिक घातक असेल,” अशी भीती व्यक्त केली आहे. “धूम्रपान आणि अल्कोहोलवर भारतात पूर्णपणे बंदी घातली पाहिजे,” असं मत अन्य एकाने नोंदवलं आहे.

नेमका या कायद्याचा उद्देश काय?

संसदेने केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) विधेयक, 2025 मंजूर केले आहे. राज्यसभेने या विधेयकाला मंजुरी देऊन ते लोकसभेकडे परत पाठवले. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मांडलेल्या या विधेयकाचा उद्देश सिगारेट, सिगार, हुक्का, तंबाखू, चघळण्याची तंबाखू, जर्दा आणि सुगंधी तंबाखू यासह तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि उपकर वाढवण्याचा आहे.

कितीने वाढणार उत्पादन शुल्क?

सध्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, 1944 नुसार, सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार, प्रति एक हजार सीगारेटच्या काड्यांवर 200 ते 735 रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क आकारले जाते. नवीन दुरुस्तीमध्ये या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीचा प्रस्ताव आहे. त्यानुसार प्रति एक हजार सिगारेटवरील शुल्क 2700 ते 11 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. चघळण्याच्या तंबाखूवरील शुल्क 25% वरून 100% पर्यंत, हुक्का तंबाखूवरील शुल्क 25% वरून 40% पर्यंत वाढवलं जाणार आहे. पाईप आणि सिगारेटसाठीच्या धूम्रपान मिश्रणावरील शुल्कात 60% वरून 325% पर्यंत मोठी वाढ होणार आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!