Homeदेश-विदेशवाहन तंदुरुस्ती चाचणी बातम्या शासन शुल्क 10 पट पर्यंत वाढवते अद्यतनित किंमत...

वाहन तंदुरुस्ती चाचणी बातम्या शासन शुल्क 10 पट पर्यंत वाढवते अद्यतनित किंमत तपासा

वाहन फिटनेस चाचणी बातम्या: केंद्र सरकारने वाहनांसंदर्भात एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करण्यात आली असून जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या नियमांनुसार काही व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क थेट 10 पटींनी वाढण्यात आलंय. तर दुसऱ्या बाजूला 15 ऐवजी 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांनाही फिटनेस शुल्क भरावं लागणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दर दोन वर्षांनी…

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी पूर्वीची 15 वर्षांची मर्यादा आता 10 वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करत 10 वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क 10 पटीपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी दर दोन वर्षांनी चाचणी देणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

हे करण्याचा हेतू काय?

जुनी आणि प्रदूषणकारी वाहने रस्त्यांवरून कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी आपल्या जुन्या वाहनांची तत्काळ फिटनेस चाचणी करून शुल्क भरावे अन्यथा मोठ्या भुर्दंडाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

वाहन मालक संतप्त

केंद्र सरकारने वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठीच्या शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने वाहनधारक नाराज आहेत. अशातच याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागणार असल्याने या शुल्कवाढीविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे वाहनधारकांनी वाहनांची फिटनेस चाचणी करून घेण्याचे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

किती असेल शुल्क?

नव्या तरतुदींनुसार बेकायदा वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क एक हजार रुपये निश्चित केले आहे. दुचाकींसाठी हे शुल्क 2 हजार रुपये, तीन चाकीसाठी पाच हजार रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही) नोंदणी नूतनीकरण शुल्क 10 हजार रुपये असेल. याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी 20 हजार रुपये आणि आयात केलेल्या चारचाकी वाहनांसाठी 80 हजार रुपये आकारले जाईल. इतर श्रेणीतील वाहनांसाठी हे शुल्क 12 हजार रुपये असेल, असे सांगण्यात आले.

फिटनेस चाचणी म्हणजे काय?

वाहनांची फिटनेस चाचणी (Vehicle Fitness Test) ही एक चाचपणी प्रक्रिया आहे. या चाचपणीदरम्यान वाहन रस्त्यावर चालण्यासाठी योग्य स्थितीत आहे की नाही हे तपासून पाहिलं जातं. तसेच वाहनाच्या पर्यावरणीय मानकांची तपासणी केली जाते. भारतातील मोटर वाहन कायदा, 1988 नुसार फिटनेस चाचणी अनिवार्य आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) किंवा अधिकृत स्वयंचलित चाचणी केंद्रांद्वारे ही चाचणी केली जाते. ही चाचणी मुख्यतः व्यावसायिक वाहनांसाठी (ट्रक, बस, टॅक्सी) अनिवार्य आहे. खासगी वाहनांसाठी (कार, बाइक) देखील विशिष्ट वेळेनंतर फिटनेस चाचणी करुन घेणं अनिवार्य असतं.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!