Homeदेश-विदेशउद्धव ठाकरे शिवसेनेने दिल्लीत कॅथेड्रल चर्च ऑफ रिडेम्पशनला भेट देऊन मॉलमधील ख्रिसमसच्या...

उद्धव ठाकरे शिवसेनेने दिल्लीत कॅथेड्रल चर्च ऑफ रिडेम्पशनला भेट देऊन मॉलमधील ख्रिसमसच्या सजावटीची तोडफोड करून पंतप्रधान मोदींवर टीका केली.


पंतप्रधान मोदींची चर्चला भेट आणि ख्रिसमसच्या सजावटीची तोडफोड: “नाताळ सण आपल्या समाजात सद्भावना आणि बंधुभाव आणेल अशी आशा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नाताळनिमित्त देशातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. मोदी हे इतके भारावून गेले की, ते दिल्लीतील ‘पॅथेड्रल चर्च ऑफ रिडेम्पशन’ येथे नाताळनिमित्त सकाळच्या प्रार्थनेत सहभागी झाले. त्यांनी ‘येशू’ ख्रिस्ताची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. या प्रार्थनेमुळे मोदी यांच्या मनात प्रेम, शांतता व करुणा यांची ऊर्जा निर्माण झाली. बिशप पॉल स्वरूप यांच्यातर्फे पंतप्रधानांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधानांनी चर्चमधील भाविकांसोबत कॅरोल गायन केले. पंतप्रधान बराच वेळ ख्रिस्ती भाविकांत रमले. चर्चमधून बाहेर पडताना मोदी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता व चर्चमध्ये वावरताना पंतप्रधान जणू अयोध्या, मथुरा, द्वारकेत फिरत असल्याचा आव आणि भाव आणत होते. म्हणजे मोदी यांनी चर्चमध्ये जाऊन शुभेच्छा देण्याचे काम मनापासून केले हे मानावे लागेल, पण त्याच वेळी देशातील अनेक ठिकाणी मोदींना मानणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या झुंडी ‘नाताळ’ सण साजरा करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांवर हिंसक हल्ले करीत होत्या,” असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खोचक शब्दांमध्ये विरोधाभास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

याला ढोंग नाही, तर काय म्हणायचे?

“आसाम, छत्तीसगड व अन्य ठिकाणी नाताळनिमित्त करण्यात आलेल्या सजावटी उद्ध्वस्त केल्या गेल्या. सांताक्लॉजच्या प्रतिमा ओढून खाली खेचल्या व तुडवल्या गेल्या. अनेक शाळा, कॉलेजांत नाताळ एक उत्सव म्हणून साजरा होतो. तेथे जाऊन मोदीभक्त हिंदुत्ववाद्यांनी गोंधळ घातला व नाताळ साजरा करणाऱ्यांना धमक्या दिल्या. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास त्यांना भाग पाडले. नाताळचे सामान विकणाऱ्या दुकानांत व मॉलमध्ये घुसून हैदोस घातला. ठिकठिकाणी चर्चसमोर बेबंद धिंगाणा घातला व ख्रिस्ती बांधवांना धमकावण्यात आले. भारतातील हे चित्र भयावह आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. “गेल्या दहा वर्षांपासून भारतातील सर्वच धर्मांत हे भयाचे वातावरण आहे. बाहेर ख्रिस्ती बांधवांवर हल्ले व नाताळचा सण उद्ध्वस्त केला जात असताना पंतप्रधान मोदी चर्चमध्ये घुसून बिशपबरोबर प्रार्थना करतात. प्रेम, शांतता, करुणेसाठी येशूकडे प्रार्थना करतात. याला ढोंग नाही, तर काय म्हणायचे?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

मोदी या हल्लेखोरांवर का डाफरले नाहीत?

“भारतात आज कोणीच सुरक्षित नाही. काँगेस राज्यात ‘हिंदू खतरे में’ असल्याची बोंब जे लोक ठोकत असत तेच लोक मोदी राज्यातही पुन्हा हिंदू खतऱ्यात असल्याचे सांगत ख्रिश्चन आणि मुसलमानांवर हल्ले करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या राजवटीत मुसलमानांचे झुंडबळी गेले व ख्रिश्चनांच्या उत्सवांवर हल्ले सुरू झाले. नाताळनिमित्त मोदी इंग्लंडचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, फ्रान्सच्या राष्ट्रपतींना शुभेच्छा देणार व स्वतःच्या देशात ख्रिश्चनांवर होणाऱ्या हल्ल्यांचा साधा निषेधही करणार नाहीत. पुन्हा आता जे ख्रिश्चनांवर हल्ले झाले ते भाजपशासित राज्यांत झाले हे महत्त्वाचे. एरवी ऊठसूट काँग्रेसवर डाफरणारे मोदी या हल्लेखोरांवर का डाफरले नाहीत, हे एक रहस्यच आहे,” असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

बेइमान, देशद्रोही हिंदुत्ववाद्यांपेक्षा प्रखर राष्ट्राभिमानी मुसलमान, ख्रिश्चन, पारशी परवडले

“मोदी ‘इस्लामी’ देशांत जाऊन मेजवान्या झोडतात, तेथील मशिदीत जातात. इस्लामी राज्यकर्त्यांच्या गळाभेटी घेतात. इस्लामी राष्ट्रांशी व्यापार करतात, पण भारतात त्यांना मुसलमान नको. त्यामुळे हिंदू-मुसलमानांतली तणावाची आग ते राजकीय स्वार्थासाठी भडकवत ठेवतात. गोमांसावरून मुसलमानांचे झुंडबळी घेतले गेले, पण ख्रिश्चन बांधव भारतासह जगभरात ‘बीफ’ म्हणजे गोमांस खातात व गोव्यासारख्या भाजपशासित राज्यात गोमांस मुबलक प्रमाणात मिळते. त्याचे वावडे पंतप्रधान मोदी व त्यांच्या अंधभक्तांना नाही. गोमांस प्रकरणात मुसलमानांचे झुंडबळी गेले तेव्हा पंतप्रधान मोदी यांना ‘प्रेम, शांतता व करुणा’ या संदेशाचा विसर पडला. मुंबईचा महापौर ‘खान’ होईल, अशी भीती महाराष्ट्रातील मोदीवादी राज्यातील लोकांना घालत आहेत, पण संरक्षण खात्याची गुपिते विकणारे व लाच घेणारे जे लष्करी अधिकारी सापडले त्यात ‘खान’ नसून सर्व संघ परिवाराचीच ‘घाण’ आहे हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानसारख्या राष्ट्राला संरक्षण खात्याची गुपिते देणारा कुरुलकर हा काही ‘खान’ नाही. तो मोदींचा भक्त आहे. अशा अनेक भक्तांचे मुखवटे गेल्या काही काळात गळून पडले. बेइमान, देशद्रोही हिंदुत्ववाद्यांपेक्षा प्रखर राष्ट्राभिमानी व देशासाठी छातीवर गोळ्या झेलणारे मुसलमान, ख्रिश्चन, पारशी परवडले,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

76 मुस्लिमांच्या छातीवर गोळ्या चालवल्या

“फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी 1971 साली पाकिस्तानचे तुकडे केले. जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा खान अब्दुल गफार खान म्हणाले होते, ‘‘जर तुम्ही एका तरी मुस्लिमाच्या पाठीवर गोळी दाखवली तर मी स्वातंत्र्य लढयातून स्वतःच दूर होईन.’’ जालियनवाला बाग हत्याकांडानंतर दोन दिवस पोस्टमार्टेम चालले. 76 मुस्लिमांच्या छातीवर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या, त्यातील एकही गोळी त्यांच्या पाठीवर लागली नव्हती हा इतिहास आहे. ख्रिश्चन, मुसलमानांवर हल्ले करणाऱ्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. मोदी यांच्या भक्तांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण ख्रिश्चन, मुसलमानांत भय निर्माण करून, त्यांच्यावर हल्ले करून ते शक्य नाही. भारतीय संविधानानुसार ‘भारतमाता की जय’ म्हणणाऱ्या सगळ्यांचाच हा देश आहे!” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!