Homeदेश-विदेशIndias richest CEOs Sundar Pichai and Satyanarayana are nowhere near them in...

Indias richest CEOs Sundar Pichai and Satyanarayana are nowhere near them in terms of wealth Marathi news | भारतातील सर्वात श्रीमंत CEO, संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्या खूपच पुढे!

जयश्री उल्लाल यांची कथा: भारतातील सर्वात श्रीमंत CEO कोण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्ती संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्यादेखील खूपच पुढे आहेत. जयश्री उल्लाल असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म 1961 मध्ये लंडनमध्ये झाला पण त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या जयश्रींनी दिल्लीच्या कॉन्वेंट ऑफ जीसस अँड मेरी शाळेत शिकताना मेहनत आणि शिक्षणाला प्राधान्य दिले. त्याकाळी मुलींसाठी इंजिनिअरिंग सारखे क्षेत्र निवडणे आव्हानात्मक होते, तरीही त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची वाट निवडली आणि अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतले. हे त्यांच्या धैर्याचे आणि महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

करिअरची सुरुवात कशी झाली?

अमेरिकेत पोहोचल्यानंतर जयश्रींनी टेक क्षेत्रात महिलांची कमी संख्या पाहिली, पण त्यांनी याला संधी म्हणून स्वीकारले. त्यांनी फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर आणि एएमडी सारख्या कंपन्यांमध्ये काम करत कॉम्प्युटर चिप्सच्या निर्मितीचा अनुभव मिळवला. नंतर क्रेसेंडो कम्युनिकेशन्समध्ये मार्केटिंगच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले. 1993 मध्ये सिस्कोने ही कंपनी विकत घेतली आणि जयश्रींच्या करिअरला खरी गती मिळाली.

सिस्कोमध्ये मिळाले यश

सिस्कोमध्ये 15 वर्षे काम करताना जयश्रींनी नेटवर्किंग व्यवसायाला अब्जावधी डॉलर्सपर्यंत वाढवले. त्या सीनियर व्हाइस प्रेसिडेंट होऊन 15 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळल्या. पण 2008 मध्ये त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून अरिस्टा नेटवर्क्स नावाच्या छोट्या स्टार्टअपमध्ये सीईओ म्हणून प्रवेश केला. हा धाडसी निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा म्हणून आपण पाहू शकतो.

अरिस्टा नेटवर्क्सची वाढ

अरिस्टा नेटवर्क्स क्लाउड नेटवर्किंगसाठी स्विच आणि राउटर बनवते, जे मोठ्या डेटा सेंटर्सना जोडण्याचे काम करते. जयश्रींच्या नेतृत्वात ही कंपनी छोट्या खोलीतून बाहेर पडली आणि 2014 मध्ये आयपीओ आणून शेअर बाजारात यशस्वी झाली. त्यांनी हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरवर भर दिला, ज्यामुळे गूगल, फेसबुक सारख्या कंपन्या ग्राहक झाल्या. आज अरिस्टा जगातील आघाडीची नेटवर्किंग कंपनी आहे.

संपत्तीची तुलना

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जयश्रींची एकूण संपत्ती 50170 कोटी रुपये आहे, जी मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला  यांची संपत्ती 9770 कोटी आणि गूगलचे सुंदर पिचाई यांची संपत्ती 5810 कोटी आहे. जयश्रींची संपत्ती यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. ही संपत्ती त्यांच्या कंपनीतील शेअर्समधून आली आहे.

काय दिलाय संदेश?

जयश्री सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात पण त्यांच्या बोलण्यात दिल्लीची साधेपणा आजही जाणवतो. यशाचा कोणताही शॉर्टकट नाही; फक्त मेहनत, विश्वास आणि योग्य वेळी जोखीम घेणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात. भारतीय मूलाच्या व्यक्ती जगातील टेक क्षेत्रात कशा प्रकारे इतिहास घडवू शकतात, हे त्यांच्या कहाणीतून दिसून येतं.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!