Homeदेश-विदेशतिरुअनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने आश्चर्यकारक विजय मिळवला व्हीव्ही राजेश यांनी महापौरपदाची शपथ घेतली.

तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने आश्चर्यकारक विजय मिळवला व्हीव्ही राजेश यांनी महापौरपदाची शपथ घेतली.


भाजपच्या विजयी महापौरांनी घेतली शपथ महाराष्ट्रात पालिकांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु असतानाच भाजपाने इतिहास रचला आहे. भाजपाचे व्ही.व्ही. राजेश यांनी महापौरपदाची शपथ घेतली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी केरळची राजधानी तिरुवनंतपुरमचे महापौर म्हणून शपथ घेतली. या शपथविधीह दक्षिण भारतातील राज्याच्या राजकीय पटलावर एक महत्त्वपूर्ण क्षण नोंदवला गेला. पदभार स्वीकारल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ. सर्वांगीण विकास करु. सर्व 101 प्रभागांमध्ये विकासकामं राबवली जातील. तिरुवनंतपुरमचे एका विकसित शहरात रूपांतर केलं जाईल.”

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

व्ही.व्ही. राजेश यांचा शपथविधी भाजपासाठी फार महत्त्वाचा आहे. सहा महिन्यांपूर्वी भाजपाला याच राज्यात मोठा संघर्ष करावा लागला होता. पक्षाने केरळमध्ये कधीही सत्ता मिळवलेली नाही आणि त्यांचे फक्त एकच आमदार होते. ओ. राजगोपाल यांनी 2016 मध्ये नेमोम मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. तसंच अभिनेते सुरेश गोपी हे एकमेव खासदार आहेत, ज्ययांनी 2024 मध्ये त्रिशूरमधून विजय मिळवला आहे.

महापौर निवडीसाठी झालेल्या मतदानात 45 वर्षीय व्ही व्ही राजेश यांना 100 सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा एक मत जास्त मिळालं. सीपीआय(एम) चे आर.पी. शिवाजी यांना 29 आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे के.एस. सबरिनाथन यांना 19 मतं मिळाली. एका नगरसेवकाने, जो एक अपक्ष सदस्य आहे, मतदानात भाग घेतला नाही. दुसऱ्या अपक्ष नगरसेवक पी. राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाला.

9 डिसेंबरच्या निवडणुकीत भाजपने 50 जागा जिंकल्या होत्या, जो पक्षासाठी रेकॉर्ड आहे. राजेश यांच्या महापौरपदाने केरळच्या शहरी राजकारणात भाजपसाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. भाजपाचा राज्याच्या राजधानीतील हा विजय शहराच्या महानगरपालिकेवर 45 वर्षांपासून असलेल्या सीपीएमच्या नियंत्रणाला संपुष्टात आणणारा ठरला आहे. विशेष म्हणजे  2009 पासून काँग्रेसचे शशी थरूर यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे.

समारंभानंतर केरळ भाजपचे प्रमुख राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकारांना सांगितले, “काँग्रेसच्या अप्रत्यक्ष किंवा पडद्यामागील पाठिंब्याने सीपीएमने तिरुवनंतपुरमची दयनीय अवस्था केली आहे. दुर्दैवाने, ही महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. आम्ही प्रचारादरम्यान उघड केल्याप्रमाणे, या महानगरपालिकेने पैशांची उधळपट्टी केली आहे आणि तिरुवनंतपुरमच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. गटार, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत समस्यांकडेही गेल्या 45 वर्षांपासून दुर्लक्ष केले गेले आहे”.

पुढे त्यांनी म्हटलं की, “म्हणूनच, ज्या दिवसापासून लोक आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी देतील, त्या दिवसापासून आम्ही तिरुवनंतपुरमच्या विकासावर काम सुरू करू, असं आम्ही म्हटलं आहे. आमचे महापौर राजेश यांनी सांगितल्याप्रमाणे, आम्हाला तिरुवनंतपुरम शहराला देशातील पहिल्या तीन शहरांपैकी एक बनवायचे आहे. तेच आमचे ध्येय आहे. आणि त्यासाठी आमच्या कामाची सुरुवात आजपासून होत आहेठ.

मात्र या पालिकेत भाजपात राजकीय कुरघोडीही पाहायला मिळाली. भाजपचा वैचारिक मार्गदर्शक मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोरदार पाठिंब्यामुळे राजेश यांच्या बाजूने एकमत होण्यापूर्वी, पक्ष राजेश आणि माजी पोलीस महासंचालक आर. श्रीलेखा यांच्यात विभागला गेला होता, अशी माहिती आहे.

सीबीआयमधील चार वर्षांच्या कार्यकाळात आर्थिक गुन्हे हाताळताना वारंवार छापे टाकल्यामुळे ‘रेड श्रीलेखा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलेखा यांनी सास्थामंगलम प्रभागातून विजय मिळवला. आता केंद्रीय मंत्री असलेले गोपी आणि माजी केंद्रीय मंत्री व सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत राजेश यांनी शपथ घेतली.

एकंदरीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीसाठी धक्का मानले जात आहेत. कारण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने सहापैकी चार नगरपालिकांवर नियंत्रण मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आणि हा भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाचा परिणाम असल्याचे सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!