Homeदेश-विदेशमहाराष्ट्र हवामान बातम्या 25 डिसेंबर पुणे नाशिकमध्ये थंडीची लाट सुरूच मुंबईच्या तापमानात...

महाराष्ट्र हवामान बातम्या 25 डिसेंबर पुणे नाशिकमध्ये थंडीची लाट सुरूच मुंबईच्या तापमानात घट, हिमाचल काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टी

महाराष्ट्र हवामान बातम्या: कोरडी हवा आणि उत्तरेकडून वाहत येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसला. उत्तर महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिक गारठला असून, विदर्भ आणि मराठवाड्यासह अगदी मुंबई आणि नवी मुंबईपर्यंत ही थंडीची लाट प्रभाव पाडताना दिसून आली. मात्र गेल्या 24 तासांमध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये तापमानात चढ- उतार झाल्याचं दिसून आलं. पुढच्या 24 तासांमध्ये शहरात ही स्थिती स्थिर राहणार असून, राज्याच्या काही भागांमध्येसुद्धा तापमानात अंशत: चढ उतार पाहायला मिळणार आहेत. असं असलं तरीही राज्यात गारठा मात्र कायम राहणार असल्याचाही इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मागील 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, परभणीमध्ये थंडीच्या लाटेसदृश्य परिस्थिती होती. ज्यामुळं तापमानाच काहीशी वाढ झाली असली तरीही गारठा काही इतक्यात पाठ सोडणार नाही. परिणामी पुणे, सातारा, कोल्हापूरातही गारठा जाणवणार आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा 9 ते 12 अंश सेल्सिअस (किमान) इतका असेल, तर कमाल तापमानाचा आकडा 28 ते 30 अंशांदरम्यान असेल. सध्या थंडीची परिस्थिती आणि सुट्ट्यांचा माहोल पाहता राज्यातील गिरीस्थानं आणि पर्यटनस्थळांच्या दिशेनं अनेकांचेच पाय वळताना दिसत आहेत. पुढील 48 तासांमध्ये पुणे शहर, जिल्हा आणि नजीकच्या जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं असेल तर, दिवसा मात्र उन्हाचा चटका जाणवेल असा अंदाज आहे.

केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं देशातही थंडीचा कडाका कमीजास्त होणार असला तरीही उत्तर भारतात मात्र परिस्थिती ही गारठवणारीच असेल असा इशारा जारी केला आहे. तर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील बहुतांश भाग आणि पूर्वोत्तर भारतामध्ये दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राच्याही बहुतांश भागांमध्ये पहाटेपासून सूर्य डोक्यावर येईपर्यंत धुकं असल्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होणार आहे.

देशात काय आहे थंडीची स्थिती?

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तापनात घट होत असतानाच काश्मीरच्या खोऱ्यात सुरू असणाऱ्या अती थंड पर्वामुळं तापमानात लक्षणीय घट होत आहे. हिमालयावरून वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग संतुलित असून त्यामुळं पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. हिमाचलच्या रेकाँगपिओ इथं वारे ताशी 37 किमी इतक्या वेगानं वागत असून, लाहौलच्या खौऱ्यात असणाऱ्या ताबो, कुकुमसेरी, किलाँग इथं तापमान शून्याहूनही कमी आहे. मात्र बर्फवृष्टीचा इशारा नाही. सध्याच्या घडीला काश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू असून येत्या काळात बर्फाची ही चादर आणखी जास्त क्षेत्र व्यापणार असल्याचा इशारा देत या भागांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्यांनाही तापमानाला अनुसरून पुढील बेत आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!