आयएएस अधिकारी टीना दाबी यांना रील स्टार म्हणून संबोधल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी टीना डाबी यांना “रील स्टार” म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप राजस्थानमधील बारमेर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी बारमेरच्या महाराणा भूपाल कॉलेज (MBC) गर्ल्स कॉलेजबाहेर परीक्षा शुल्क वाढीविरोधात निदर्शनं करत होते. यावेळी 22 वर्षांच्या असताना पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण झालेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांना भेटून हा मुद्दा उपस्थित करू इच्छित होते. तथापि, एका अधिकाऱ्याने टीना डाबी त्यांच्यासाठी “रोल मॉडेल” असल्याचे सांगितल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली.
भाजप समर्थित विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी (ABVP) संबंधित काही विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्याच्या मताशी असहमती दर्शवली. “जिल्हाधिकारी आदर्श नाहीत. जर त्या असत्या तर त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी येथे आल्या असत्या. त्या एक रील स्टार आहेत, रील बनवण्यासाठी सर्वत्र जातात, परंतु आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत,” असं ते म्हणाले.
आमचं धरणे आंदोलन संपल्यानंतर ताब्यात घेण्यात आलं असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर अनेक विद्यार्थी पोलीस ठाण्याभोवती जमले आणि ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेची मागणी केली. वरिष्ठ पोलिस अधिकारी मनोज कुमार यांनी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही किंवा अटक केलेली नाही असा दावा केला.
विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी झालेली अटक अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांच्या मुळावरच आघात करणारी आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींना कलेक्टर, IAS टीना दाबी यांच्याशी बोलण्यास सांगितले, तेव्हा तिला “खरी स्टार” असे संबोधून ABVP विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले… pic.twitter.com/xrfxxiievz
— ABVP (@ABVPVoice) 22 डिसेंबर 2025
“पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलं नाही किंवा अटक केली नाही. आम्ही कोणत्याही मुलीशी गैरवर्तन केलं नाही. परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही चार मुलांना पोलीस ठाण्यात आणले आणि नंतर त्यांना निघून जाण्यास सांगितले. तथापि, विद्यार्थी पोलिस ठाण्याजवळ जमले आणि प्रशासनाकडून माफीची मागणी केली. आमचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांच्याशी बोलेपर्यंत ते काही वेळ तिथेच राहिले,” असं त्यांनी एनडीटीव्हीला सांगितलं.
टीना डाबी यांनी फेटाळले आरोप
“कोणालाही कधीही अटक करण्यात आली नाही किंवा ताब्यातही घेण्यात आलं नाही. फी वाढीचा प्रश्न सुटला असूनही काही विद्यार्थी रस्ता अडवत होते आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना चर्चा करण्यासाठी आणि शांत करण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर दोन तासांनी ते निघून गेले आणि मुद्दा संपला,” असं त्यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे.

“हा मुद्दा फक्त सोशल मीडियावर जिवंत आहे. सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते फक्त बदनाम करण्यासाठी आणि स्वस्तात प्रसिद्धी मिळविण्यासाठी आहे,” असं त्या पुढे म्हणाल्या.
राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेकांनी कथित कारवाईबद्दल टीका केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “भारतातील आणखी एक नोकरशाह असहिष्णुत होण्याचा आणखी एक दिवस आहे. भ्रष्टाचार, सत्तेचा नशा आणि आता असहिष्णुता असूनही ते कठोर छाननीला टाळत आहेत,” असं चतुर्वेदी यांनी एक्सवर लिहिलं.
“विद्यार्थ्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी केलेली अटक अत्यंत निषेधार्ह आहे आणि लोकशाही मूल्यांच्या गाभ्यावर आघात करते,” असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटलं आहे.





















