Homeदेश-विदेश21 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारी उत्तरायण उन्हाळी संक्रांती दिवस 10 तासांची...

21 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारी उत्तरायण उन्हाळी संक्रांती दिवस 10 तासांची रात्र 13 तासांची असेल

उन्हाळी संक्रांती: येत्या रविवारी म्हणजेच 21 डिसेंबरचा संपूर्ण दिवस अत्यंत खास असणार आहे. यामागील कारण म्हणजे या दिवशी एक महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. हाच तो दिवस आहे ज्या दिवशी उत्तरायण सुरु होणार आहे. विशेष म्हणजे 21 डिसेंबरच्या 24 तासांच्या दिवसापैकी 13 तास रात्र असणार आहे. तर 10 तास दिवस असेल. यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

हा दिवस कसा असणार?

यंदा 21 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून उत्तरायणास प्रारंभ होतो. या दिवशी दिवस 10 तास 57 मिनिटांचा असून, रात्र 13 तास 3 मिनिटांची असेल. या दिवसानंतर दिवस मोठे होऊ लागतील. दिवस वाढणे ही नकारात्मक नव्हे, तर आनंददायी घटना असल्याचे सोमण यांनी नमूद केले. सूर्य उत्तरायणात प्रवेश करत दिवस वाढू लागण्याची खगोलीय घटना म्हणजे मकरसंक्रांत असून, या सणाबाबत समाजात असलेली ‘संक्रांती अशुभ असते’ ही समजूत पूर्णतः चुकीची असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

मकरसंक्रांतीचा सण केव्हा साजरा करावा?

मकरसंक्रांत ही निसर्गातील सकारात्मक बदलाची आणि आनंदाची घटना असून, ती अशुभ मानण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सोमण यांनी सांगितले. आपली पंचांग ही निरयन राशी-नक्षत्रांवर आधारित असल्यामुळे बुधवार, 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 05 मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मकरसंक्रांतीचा सण 14 जानेवारी रोजी साजरा करावा, असे सोमण यांनी सांगितले. मकरसंक्रांत नेहमीच 14 जानेवारीलाच येते, ही समजूतही चुकीची आहे.

उत्तरायण म्हणजे काय?

उत्तरायण आणि दक्षिणायण हे हिंदू कालगणनेनुसार आणि खगोलशास्त्राशी संबंधित संकल्पना आहेत.  सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेतील हालचालींवरुन ही नावं पडली आहेत. पृथ्वी अक्षीय कलल्याने आणि सूर्याच्या वार्षिक मार्गामुळे उत्तरायण आणि दक्षिणायण होतं. जेव्हा सूर्य उत्तर दिशेने (उत्तर गोलार्धाकडे) सरकतो, तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. हे सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासाची सुरुवात असते. हिंदू धर्मात उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. यात दिवस लांब होतात, हिवाळा संपतो आणि वसंत ऋतू सुरू होतो. या काळात विवाह, पूजा, दान इत्यादी शुभ कार्य केले जातात. भगवद्गीतातही उत्तरायणात मृत्यू येणे मोक्षप्राप्तीसाठी शुभ मानले जाते.

दक्षिणायण म्हणजे काय?

जेव्हा सूर्य दक्षिण दिशेने (दक्षिण गोलार्धाकडे) सरकतो, तेव्हा त्याला दक्षिणायण म्हणतात. हे सूर्याच्या दक्षिणेकडील प्रवासाची सुरुवात असते. जूनच्या ग्रीष्मकालीन संक्रांतीपासून डिसेंबरच्या शीतकालीन संक्रांतीपर्यंत. भारतात हे कर्क संक्रांती म्हणजेच, 15-16 जुलैपासून सुरू होते. हा काळ अशुभ किंवा कमी शुभ मानला जातो, कारण दिवस लहान होतात आणि हिवाळा सुरू होतो. तरीही, काही धार्मिक कार्य चालू राहतात, पण उत्तरायण इतका महत्वाचा नाही. दक्षिणायणात पावसाळा आणि शरद ऋतू येतात.

वैज्ञानिक स्पष्टीकरण

पृथ्वीचा अक्ष 23.5 अंश झुकलेला असल्यामुळे सूर्याचे उत्तर-दक्षिण हालचाली दिसतात. उत्तरायणात उत्तर गोलार्धात उष्णता वाढते, तर दक्षिणायणात दक्षिण गोलार्धात उष्णता अधिक असते. हे दोन्ही काळ प्रत्येकी अंदाजे ६ महिने असतात आणि एकत्रितपणे एक सौर वर्ष बनवतात.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!