Homeदेश-विदेशकामावर लवकर पोहोचणे महागात पडल्याने संतापलेल्या बॉसने तिला काढून टाकले आता महिला...

कामावर लवकर पोहोचणे महागात पडल्याने संतापलेल्या बॉसने तिला काढून टाकले आता महिला न्यायालयात आहे मराठी बातम्या


कार्यालयात लवकर पोहोचणे: तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल तर काही कर्मचारी रोज ऑफिसला उशिरा येत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. अनेकदा त्यांना समज देऊनही ते दरवेळेस नवीन कारण देत असल्याचेही तुमच्या निदर्शनास आले असेल. काही कंपन्यांमध्ये असा बेशिस्तपणा खपवून घेतला जात नाही. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण ऑफिसला दररोज लवकर आल्यामुळे कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याचे कधी ऐकलायत का? असे एक प्रकरण कोर्टात पोहोचलंय. त्याबद्दल जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

स्पेनच्या अलिकांटे शहरात राहणाऱ्या एका तरुण महिलेच्या आयुष्यात एक आश्चर्यकारक वळण आलं. ती एका डिलिव्हरी फर्ममध्ये नोकरी करत होती. तिथे तिची शिफ्ट सकाळी 7.30 वाजता सुरू होत असे. मात्र, तिच्या जबाबदारीच्या भावनेमुळे ती नेहमीच 6.45 ते 7.00 च्या आधी कार्यालयात हजर व्हायची. सुरुवातीला हे मॅनेजमेंटला खूप इम्प्रेसिव्ह वाटले. पण लवकरच याचा उलट परिणाम झाला. हिचे लवकर कामावर येणे हे कामात व्यत्यय आणणारे आहे, असे कंपनीला वाटू लागले. कारण तेव्हा तिच्यासाठी कोणतेही टास्क उपलब्ध नसत.

कंपनीकडून आली नोटीस

2023 मध्ये कंपनीने महिलेला पहिल्यांदा इशारा दिला.  वेळेचे पालन करा आणि अनावश्यक लवकर येणे टाळा, असे तिला सांगण्यात आले. शिफ्टच्या वेळेनुसारच पोहोचण्याचा सल्ला तिला देण्यात आला. पण महिलेच्या सवयीला हे मान्य नव्हते; ती दररोजच पूर्वीप्रमाणेच येते राहिली. व्यवस्थापनाने अनेकदा तिच्याशी चर्चा केली. तुझ्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले, तरी तिने हा मुद्दा हलक्यात घेतला. यामुळे कंपनी आणि तिच्यात तणाव वाढला आणि अंततः कंपनीनकडून कठोर निर्णय घेण्यात आला. तिला नोटीस पाठवण्यात आली.

कंपनीविरोधात कायदेशीर लढा

‘गंभीर अनुशासनभंग’ असा ठरवून कंपनीने त्या महिलेला नोकरीतून काढून टाकले. तिच्या या वर्तनामुळे व्यवस्थापनाला अडचणी येतात, कामाची रचना बिघडते आणि कंपनी धोरणांची पायमल्ली होते, असा युक्तीवाद कंपनीने कोर्टात केला. पण महिलेला हे अन्यायकारक वाटले. लवकर येणे हे तर सकारात्मक गुण, तरी नोकरी कशी जाईल? असा प्रश्न तिने उपस्थित केला आणि लगेचच अलिकांटेच्या सामाजिक न्यायालयात अपील दाखल केले. तिने न्यायाची मागणी केली. पण न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

न्यायालयाचा निकाल

न्यायालयाने महिलेच्या विरुद्ध जाऊन कंपनीला निर्दोष ठरवले. कर्मचाऱ्याने कंपनीच्या सूचनांचे पालन न केल्याने हे ‘अनुशासनहीन वर्तन’ होते. लवकर पोहोचणे हे कायद्याने गुन्हा नसले तरी नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे ठरते. या निर्णयाने स्पेनमधील श्रमकायद्याची व्याख्या स्पष्ट झाली. जबाबदारी असो वा नाही, कंपनीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन आवश्यक. हे प्रकरण आता श्रमिक हक्कांच्या चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे.

सोशल मीडियावर चर्चा

या  सोशल प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवली. बहुतांश यूजर्सनी याप्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले, “लवकर येणेही चूक? हे कसे शक्य?” असा प्रश्न विचारला. तर काहींनी हसत म्हटले, “भारतात असते तर बॉसने प्रमोशन दिले असते!” दुसऱ्याने घटनेचा उपहास केला, “कंपनीला नेमके काय हवे? उशीरा आलो तर दंड, लवकर आलो तर दंड – म्हणजे घरीच राहा!” नोकरीत सवयी चांगल्या असल्या तरी कंपनी नियमांचे रक्षण करणे महत्त्वाचे, हे यातून कळते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १.स्पेनमधील त्या महिलेला खरंच फक्त लवकर ऑफिसला पोहोचल्यामुळेच नोकरीतून काढले का?

उत्तर: हो, मुख्य कारण तेही होतं! तिची शिफ्ट सकाळी ७:३० वाजता सुरू होत होती, पण ती दररोज ६:४५ ते ७:०० वाजता येत असे. कंपनीने अनेकदा लेखी व मौखिक सूचना दिल्या की “अनावश्यक लवकर येऊ नका, वेळेवर या.” तरी तिने नियमाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंपनीने हे “गंभीर अनुशासनभंग” मानले आणि नोकरीतून काढून टाकले.

प्रश्न २. न्यायालयाने कंपनीची बाजू का घेतली? लवकर येणे तर चांगली गोष्ट आहे ना?

उत्तर: न्यायालयाने स्पष्ट केले की लवकर येणे स्वतः गुन्हा नाही, पण कंपनीने वारंवार दिलेल्या स्पष्ट सूचनांचे पालन न करणे हा “अनुशासनहीनपणा” आहे. स्पेनच्या श्रमकायद्यात कर्मचाऱ्याला कंपनीच्या वेळापत्रकाचे व व्यवस्थापनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे लागते. जबाबदारी दाखवणे चांगले असले तरी नियम मोडणे महागात पडते, असा निकाल न्यायालयाने दिला.

प्रश्न ३. आता भारतात असते तर असे झाले असते का? आपल्याकडे लवकर येणाऱ्याला काढतात का?

उत्तर: भारतात असे प्रकरण फार दुर्मीळ आहे. इथे उलटेच घडते: बहुतेक बॉस लवकर येणाऱ्या कर्मचाऱ्याला पसंती देतात आणि उशिरा येणाऱ्यांना टार्गेट करतात. भारतीय कायद्यातही “अनुशासनभंग” ठरविण्यासाठी खूप गंभीर कारण लागते; फक्त लवकर येण्यामुळे नोकरी जाणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळेच ही स्पेनची घटना भारतीयांसाठी इतकी धक्कादायक आणि हसण्यासारखी वाटते!





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!