Homeदेश-विदेशकुत्र्यासोबत झोपलेल्या महिलेवर भाजप आमदार प्रमोद कुमार यांचे वादग्रस्त विधान Marathi News

कुत्र्यासोबत झोपलेल्या महिलेवर भाजप आमदार प्रमोद कुमार यांचे वादग्रस्त विधान Marathi News


भाजप आमदार प्रमोद कुमार यांच्या कुत्र्याची टिप्पणी: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी संसदेत आपल्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन गेल्या होत्या. याच मुद्द्यावर बिहारचे भाजप आमदार तथा माजी मंत्री प्रमोद कुमार यांनी अत्यंत अश्लील आणि स्त्रीद्वेष्टे विधान केले. ज्यावरुन महिला वर्गातून त्यांच्यावर टीका केली जातेय. देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय नेमकं प्रकरण?

बिहारचे भाजप आमदार तथा माजी मंत्री प्रमोद कुमार यांनी एका युट्यूबरला मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘अनेक महिलांना स्वतःच्या समाधानासाठी कुत्र्यांसोबत झोपण्याची सवय असते. मोबाईलवर व्हिडिओ पाहिले तर अशा अनेक क्लिप दिसतील’,असे ते म्हणाले. रेणुका चौधरी कुत्रा सोबत घेऊन गेल्या कारण तो त्यांचा ‘केंद्रबिंदू’ आहे, असेही ते पुढे म्हणाले. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली.

आरजेडीचा जोरदार हल्लाबोल

राजदच्या महिला नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी लिहिले, “मोदींचे लाडके आमदार म्हणतात की, महिला आपले समाधान कुत्र्यांसोबत करतात. भाजपचे नेते-प्रवक्ते यांच्याशी सहमत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या आश्रयदात्यांना महिलांबद्दल अश्लील बोलताना पाहून मोदींना आनंद होतो का? असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही या वादात खेचण्याचा प्रयत्न केला. या टीकेमुळे भाजपची मोठी अडचण झालेली दिसून येते.

महिला आयोगाकडून तात्काळ दखल

‘बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा मिश्रा यांनी स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ‘हे विधान अत्यंत निंदनीय आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आमदार प्रमोद कुमार यांना बोलावून खुलासा मागवला जाईल. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल’, असे आयोगाने म्हटले आहे.आमदाराच्या पक्षांतर्गत सहकाऱ्यांनीही त्यांचे हे विधान फेटाळले आहे. असे असले तरी पक्षाकडून अधिकृत खंडन अद्याप आलेले नाही. त्यामुळे भाजपचा अशा विचारसरणीला पाठिंबाच, असा अर्थ विरोधक लावत आहेत.

पहिलीच वेळ नाही

रेणुका चौधरींवर वैयक्तिक हल्ला करताना भाजप नेत्याने केलेले वादग्रस्त विधान ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेक भाजप नेत्यांनी महिला विरोधी, अश्लील आणि जातीयवादी वक्तव्ये केल्याचे विरोधक सांगतात. आता बिहार महिला आयोग काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जनतेचा रोष ओढावल्यामुळे प्रमोद कुमार यांची आमदारकी धोक्यात आल्याचीदेखील चर्चा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. प्रश्न: भाजप आमदार प्रमोद कुमार यांनी रेणुका चौधरी यांच्याबाबत नेमके काय आक्षेपार्ह विधान केले?

उत्तर: त्यांनी एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “अनेक महिलांना स्वतःच्या समाधानासाठी (म्हणजे लैंगिक समाधानासाठी) कुत्र्यांसोबत झोपण्याची सवय असते. मोबाईलवर व्हिडिओ पाहिले तर असे दिसते. रेणुका चौधरी संसदेत कुत्रा घेऊन गेल्या कारण तो त्यांचा केंद्रबिंदू आहे.” हे विधान अत्यंत अश्लील आणि स्त्रीद्वेष्ट्या स्वरूपाचे आहे.

२. प्रश्न: या विधानानंतर कोणी आणि काय कारवाई केली?

उत्तर: बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा मिश्रा यांनी स्वतःहून दखल घेऊन आमदार प्रमोद कुमार यांना नोटीस बजावली आहे. आयोगाकडे तक्रारी आल्यानंतर चौकशी सुरू झाली असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे. राजदनेही हा व्हिडिओ व्हायरल करून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

३. प्रश्न: राजदने या प्रकरणात मोदी आणि भाजपला कसे जोडले?

उत्तर: राजदच्या महिला नेत्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “मोदींचे लाडके आमदार असे घृणास्पद विधान करतात. भाजपचे नेते-प्रवक्ते यांच्याशी सहमत आहेत का? आपल्या आश्रयदात्यांना महिलांबद्दल अश्लील बोलताना पाहून मोदींना समाधान मिळते का?” यामुळे प्रकरण थेट पंतप्रधानांपर्यंत खेचले गेले आणि भाजपची मोठी अडचण निर्माण झाली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!