Homeदेश-विदेशएअर तिकिट बुकिंग इंडिया एव्हिएशन सेक्टर दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ ओपन लवकरच...

एअर तिकिट बुकिंग इंडिया एव्हिएशन सेक्टर दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ ओपन लवकरच नवी मुंबई नवीनतम अद्यतन


भारतातील विमानतळ: विमान प्रवास मागील काही वर्षांमध्ये सामान्यांसाठीसुद्धा एक महत्त्वाचं माध्यम ठरताना दिसलं. फक्त आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर देशांतर्गत प्रवासासाठीसुद्धा अनेक मंडळींनी विमान प्रवासालाच प्राधान्य दिलं आणि वाढती मागणी पाहता देशाच्या विविध भागांमध्ये विमानतळं आकारास आली. यातच आता दोन नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळांची भर पडणार असून, यामध्ये नवी मुंबई आणि नोएडा विमानतळांचा समावेश आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

ही दोन्ही विमानतळं पूर्णपणे सज्ज असून, ऑक्टोबर 2025 हा महिना देशातील विमान वाहतुकीसाठी विक्रमी कामगिरीचा ठरणार आहे. कारण, एकाच महिन्यात देशाच्या दोन महत्त्वाच्या शहरांना विमानतळ मिळणार आहे. प्राथमिक माहितीनुसार 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन दृष्टीक्षेपात आहे. तर, नोएडा विमानतळाचं उद्घाटन दिवाळीनंतर होण्याचा अंदाज आहे. या दोन्ही विमानतळांच्या उपलब्धतेमुळं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणाऱ्या गर्दीचं विभाजन होण्यास मदत मिळणार आहे.

जागतिक स्तरावर भारतातील शहरांची नोंद…

नव्या विमानतळांच्या उपलब्धतेमुळं न्यूयॉर्क, लंडन, टोकियो आणि पॅरिस या महत्त्वाच्या शहरांच्या यादीत आता दिल्ली आणि मुंबईच्या नावांचाही समावेश होणार आहे. ही अशा शहरांची यादी आहे, जिथं प्रवाशांच्या सुविधेसाठी एकाहून अधिक विमानतळं सेवेत आहेत.

दरम्यान देशातील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळांमुळं इंडिगो, एअर इंडिया, अकासा अशा विमानसेवा पुरवणाऱ्या आस्थापनांना आगामी काळात मोठ्या क्षमतेनं व्यवसाय विस्तार आणि नव्या मार्गांची उपलब्धता पुरवता यएणार आहे. उद्योग विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही विमानतळं दिल्ली एनसीआर आणि मुंबई एमएमआर भागांना नव्या एविएशन सेंटरमध्ये रुपांतरित करणार असून, या माध्यमातून भारतातील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मध्यपूर्व आणि युरोपातील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांशी अधिक विश्वासार्हतेनं स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यामुळं भारत आता या हवाई वाहतूक क्षेत्रात नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FAQ

भारतात कोणत्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळांचं उद्घाटन होणार आहे आणि कधी?
ऑक्टोबर 2025 मध्ये नवी मुंबई आणि नोएडा (जेवर) हे दोन नवे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, तर नोएडा विमानतळाचं उद्घाटन 30 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन कधी होईल आणि याचा परिणाम काय?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी होईल, मात्र व्यावसायिक उड्डाणं डिसेंबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. हे विमानतळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी करण्यास मदत करेल आणि मुंबई एमएमआर भागाला एक महत्त्वाचं एव्हिएशन केंद्र बनवेल.

या नव्या विमानतळांमुळे काय फायदे मिळतील?
या विमानतळांमुळे इंडिगो, एअर इंडिया, अकासा यांसारख्या विमान कंपन्यांना व्यवसाय विस्तार, नवे मार्ग आणि मोठी क्षमता मिळेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंजाब काँग्रेसमध्ये फूट: चन्नी यांनी हायकमांडचा निर्णय नाकारला

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंजाब काँग्रेसमध्ये फूट: चन्नी यांनी हायकमांडचा निर्णय नाकारला | काँग्रेस गटात मारामारीलुधियाना20 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंजाबमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या 8 महिने आधी,...

महाभारत: कर्णाची शिकवण:यश फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने मिळाले, तर ते दीर्घकाळ सन्मान मिळवून देऊ...

0
महाभारतात अश्वसेन नावाच्या एका नागाची कथा आहे. खांडव वनात एकदा भयंकर अग्नितांडव झाले होते. या अग्नितांडवात जंगलातील बहुतेक जीवजंतू नष्ट झाले होते. त्याच...

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची...

0
वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या...
spot_img

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...
error: Content is protected !!