Homeदेश-विदेशकेस फाइल्स पृष्ठे चालू करण्यासाठी लाळच्या वापरावर अत्यंत निर्विकार गलिच्छ अलाहाबाद एचसी

केस फाइल्स पृष्ठे चालू करण्यासाठी लाळच्या वापरावर अत्यंत निर्विकार गलिच्छ अलाहाबाद एचसी


केस फाइल्स पृष्ठे चालू करण्यासाठी लाळच्या वापरावर हिज कोर्टः आपल्यापैकी अनेकांना पुस्तकाची पानं उलटताना किंवा नोटा मोजताना बोटांना लाळ लावण्याची सवय असते. आपल्याला नसली तरी अशा व्यक्ती प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी पाहिल्या असतील. मग बँक असो, वाचनालय असो किंवा अगदी दुकानात अशा व्यक्ती कधी ना कधी नजरेस पडतात. मात्र अशाप्रकारे लाळ लावून पानं मोजणाऱ्यांमुळे चक्क उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे न्यायालयीन खटल्यासंदर्भातील कागदपत्रांवर लाल रंगाची लाळ दिसून येत असल्याने न्यायाधीशांनी संताप व्यक्त करताना काही स्पष्ट निर्देश दिलेत.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

फाइल्समधील कागदांवर लालसर लाळेचे डाग​

अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका आणि केस फाईल्सची पाने उलटण्यासाठी लाळेचा वापर करणाऱ्यावर आक्षेत घेतला आहे. अशापद्धतीने सरकारी कागदपत्र हाताळताना लाळेचा वापर करणे ही अत्यंत ‘घाणेरडी आणि अस्वच्छ’ पद्धत असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयासमोर सादर केलेल्या अनेक केस रेकॉर्डच्या फाइल्समधील कागदांवर लालसर लाळेचे डाग असल्याचे निरीक्षण नोंदवतानाच रजिस्ट्री आणि कायदा कार्यालयांना असे डाग दिसणारी कोणतीही कागदपत्रं स्वीकारु नयेत असे आदेश देण्यात आले आहेत. सदर लाल रंगाची लाळ ही गुटखा, पान मसाला खाणाऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्रांपर्यंत पोहचल्याचं सांगितलं जात आहे.

संसर्ग होऊ शकतो

बहराइच जिल्ह्यातील जमिनीच्या वादासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती श्री प्रकाश सिंह यांनी लाळ वापरली जात असल्याचं निरिक्षण नोंदवत त्यावर आक्षेप घेताना सदर आदेश दिला. “आज दहापेक्षा जास्त याचिका आणि अर्जांमध्ये, कागदपत्रांची पाने उलटण्यासाठी लालसर रंगाची लाळ वापरली जात असल्याचं दिसून आलं. ही अत्यंत अस्वच्छ गोष्ट आहे. ही बाब केवळ घृणास्पद आणि निंदनीय नाही तर ती मूलभूत जाणीवेचा अभाव देखील दर्शवणारी आहे,” असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा वर्तनामुळे कागदपत्रे हाताळणाऱ्यांना संसर्ग होऊ शकतो, अशी भीतीही न्यायमूर्ती सिंह यांनी बोलून दाखवली. “जर अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रथेला आळा घातला नाही, तर अशा कागदपत्रांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होईल. हे कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाही,” असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे.

नवे कोणते आदेश दिले?

न्यायाधीशांनी वरिष्ठ निबंधक आणि रजिस्ट्री कर्मचाऱ्यांना सर्व याचिका, कागदपत्रे आणि अर्ज दाखल करताना काळजीपूर्वक तपासण्याचे निर्देश दिले आहेत. असं केलं तरच या प्रथेला आळा घालता येईल, असं न्यायालयाचं म्हणणं आहे. लाळेने चिन्हांकित केलेला कोणताही कागद स्वीकारला जाऊ नये. असं न्यायालयाने सरकारी वकील आणि मुख्य स्थायी वकील यांना त्यांच्या कार्यालयात लेखी निर्देश प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक, शपथ आयुक्त आणि कर्मचारी लाळ लावण्याच्या असल्या अत्यंत घृणास्पद प्रकारापासून परावृत्त होतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आग्रा येथे पतीची हत्या करून बाथरूममध्ये पुरले:मिस्त्रीला बोलावून टाईल्स लावल्या, 45 दिवस लोकांना सांगत...

0
आग्रा येथे पत्नीने पतीची हत्या करून मृतदेह घरातील बाथरूममध्येच पुरला. कोणालाही याची माहिती मिळू नये म्हणून बाथरूममध्ये फरशा बसवल्या. 45 दिवस तिने लोकांना...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

0
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत...

भारतीय सैन्याचे हाय-टेक अपग्रेड: आकाश ट्रँगो, कामिकाझे ड्रोन समावेश

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारतीय लष्कर हायटेक अपग्रेड: आकाश ट्रांगो, कामिकाझे ड्रोन समावेश | ₹५२००० कोटी डीलनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली...

तुलसीदास मंत्र जप भाव जीवन प्रभाव, हिंदीमध्ये मंत्रजपाचे फायदे, भक्तीबद्दल प्रेरक कथा

0
6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआयुष्यात कधीकधी आपले मन कोणत्याही कामात लागत नाही. कधी थकवा, कधी ताण, कधी निराशा आणि कधी मनातील गुंतागुंत आपल्याला पूजा-पाठ,...
spot_img

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....
error: Content is protected !!