Homeदेश-विदेशआयटी क्षेत्रातील भूकंप जगातील सर्वात मोठे आयटी कंपनी अ‍ॅकेंचर लेफ 11,000 कर्मचारी...

आयटी क्षेत्रातील भूकंप जगातील सर्वात मोठे आयटी कंपनी अ‍ॅकेंचर लेफ 11,000 कर्मचारी या टाळेबंदीचे कारण धक्कादायक आहे


एक्सेंचर लेफ: अमेरिकेच्या व्हिसा आणि टॅरिफ धोरणामुळे IT क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अशातच आता IT क्षेत्रात आणखी एक महाभूकंप आला आहे. जगातील सर्वात मोठ्या IT कंपनीने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यामागे अत्यंत धक्कादायक  कारण दिले आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

आयटी कन्सल्टिंग कंपनी अ‍ॅक्सेंचरने (Accenture Layoff) गेल्या तीन महिन्यांत त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे. कंपनीने 11,000  कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. जर कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआयचा वापर शिकला नाही तर आणखी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे.

कंपनीने गुरुवारी 865  दशलक्ष डॉलर्सच्या पुनर्रचना कार्यक्रमाची माहिती दिली. कमकुवत कॉर्पोरेट मागणी आणि अमेरिकन सरकारच्या खर्चात कपातीचा परिणाम देखील त्यांच्या अंदाजात समाविष्ट केला. सीईओ जूली स्वीट यांनी विश्लेषकांना कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यामागचे कारण सांगितले आहे.  ऑगस्टच्या अखेरीस, कंपनीत 779,000 कर्मचारी कार्यरत होते.  तीन महिन्यांपूर्वी 791,000होते. कंपनीने मागील तिमाहीत कर्मचार्‍यांना नोकरीतून काढून टाकण्यासाठी आणि इतर खर्चावर 615 दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याची नोंद केली आहे आणि चालू तिमाहीत आणखी 250 दशलक्ष डॉलर्स खर्च होण्याची अपेक्षा आहे.

नोकऱ्यांमध्ये कपात झाली असली तरी, अ‍ॅक्सेंचरचे म्हणणे आहे की ते पुढील आर्थिक वर्षात त्यांच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये दरवर्षी 10 बेसिस पॉइंट्सने वाढ होत राहील. ऑगस्ट 2025 पर्यंत कंपनीचे उत्पन्न 96.7 अब्ज डॉलर्स इतके होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त आहे. निव्वळ उत्पन्न 6 टक्क्यांनी वाढून 7.83 अब्ज झाले. गेल्या दोन वर्षांपासून अल्पकालीन सल्लागार प्रकल्पांची मागणी सातत्याने कमी आहे. कंपनीने नवीन आर्थिक वर्षात 2 ते 5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या संघीय खर्चात घट हा एक प्रमुख घटक आहे.

कंपनीने मोठ्या प्रमाणात AI टूल्सचा वापर सुरु केला आहे. जनरेटिव्ह एआय प्रकल्पांसाठी त्यांची बुकिंग 5.1 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी 3 अब्ज डॉलर इतकी होती.  कंपनीकडे आता 77,000 एआय आणि डेटा व्यावसायिक आहेत, जे दोन वर्षांपूर्वी 40,000 होते. AI मुळे अ‍ॅक्सेंचर कंपनीच्या 11000 कर्मचाऱ्यांनी  नोकरी गमावली आहे.

FAQ

1 अ‍ॅक्सेंचरने गेल्या तीन महिन्यांत किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे?
अ‍ॅक्सेंचरने गेल्या तीन महिन्यांत ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. ऑगस्टच्या अखेरीस कंपनीत ७७९,००० कर्मचारी कार्यरत होते, जे तीन महिन्यांपूर्वी ७९१,००० होते.

2 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यामागचे मुख्य कारण काय आहे?
कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर शिकला नाही तर आणखी कपात होण्याची शक्यता आहे. कंपनीने AI टूल्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला असल्याने ११,००० कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. याशिवाय, कमकुवत कॉर्पोरेट मागणी आणि अमेरिकन सरकारच्या खर्चात कपात हेही कारण आहे.

3. कंपनीने पुनर्रचना कार्यक्रमाची किती रक्कम जाहीर केली आहे?
कंपनीने गुरुवारी ८६५ दशलक्ष डॉलर्सच्या पुनर्रचना कार्यक्रमाची माहिती दिली आहे. मागील तिमाहीत कर्मचाऱ्यांना काढण्यासाठी आणि इतर खर्चावर ६१५ दशलक्ष डॉलर्स खर्च झाले, आणि चालू तिमाहीत आणखी २५० दशलक्ष डॉलर्स खर्च होण्याची अपेक्षा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!