Homeदेश-विदेशजागतिक पर्यटन दिन अँड्रझेजे बर्गिल ऑक्सीझन समर्थन न पाहता माउंट एव्हरेस्ट क्लाइंब...

जागतिक पर्यटन दिन अँड्रझेजे बर्गिल ऑक्सीझन समर्थन न पाहता माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ


अँड्रझेजे बर्गिल ऑक्सीझनशिवाय माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहक: प्रत्येक व्यक्तीचा आवडीचा असा एक छंद असतो. काहींची ही आवड पुढे त्यांना इतकी झपाटून सोडते की अमुक एका गोष्टीच्या वेडापाही मंडळी कैक सीमासुद्धा ओलांडतात. काही नवे पायंडे आणि मैलाचे दगड रचतात. अशाच एका व्यक्तीनं अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. जिथं मृत्यू पावलोपावली सापळा रचून उभा असतो अशा जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणावर या व्यक्तीनं प्राणवायूशिवाय पाऊल ठेवण्याचं यशस्वी धाडस केलं.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

हे धाडस म्हणजे एका वेडाचं परमोच्च शिखरच!

जगभरातील असंख्य गिर्यारोहकांच्या मनात एकदातरी एव्हरेस्टच्या शिखरावरून जग पाहण्याची इच्छा असते. अतिशय आव्हानात्मक अशा या चढाईदरम्यान असंख्य आव्हानं येतात, अनेकांचे मृत्यूही ओढावतात. अशा या परिस्थितीत पोलंडच्या एका गिर्यारोहकानं प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर एक अद्वितीय कामगिरी केली आहे. ही कामगिरी म्हणजे, त्यानं ऑक्सिजनसाठ्याशिवायच हे शिखर सर केलं आणि शिखरावरून तो ऑक्सिजनशिवायच उतरलासुद्धा.

जबरदस्त साहसी व्हिडीओ संपूर्ण जगानं पाहिला…

रेडबुलनं सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून याच थराराचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये @andrzejbargiel नावाच्या या व्यक्तीनं स्कीइंग आणि Everest Climbing मध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याचं सांगितलं. या व्हिडीओमध्ये गिर्यारोहक बर्फाच्छादित शिखरावर प्रचंड आत्मविश्वासानं चालताना दिसत आहे.

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या माहितीनुसार आंद्रेज बार्गिल नावाच्या या गिर्यारोहकानं नेपाळमधील बेसकॅम्पमधून त्याचा एव्हरेस्टसाठीचा प्रवास सुरू केला. उंचीशी एकरुप होण्यासाठी त्यानं कॅम्प 1, 2 आणि 3 दरम्यान फेऱ्या मारल्या. कॅम्प 4 पासून त्यानं वरील चढाई सुरू केली आणि 16 तासांच्या आत ही मोहिम फत्ते केली. बार्गिल शिखरावर पोहोचल्यानंतर काही क्षणांनीच तिथून खालीसुद्धा उतरू लागला. 5 तासांमध्ये तो कॅम्प 2 मध्ये पोहोचला होता. अंधारामुळं त्याला अर्ध्यावरच तिथं स्किईंग थांबवावं लागलं. दुसऱ्या दिवशी 45 मिनिटांसाठी स्किईंग करत त्यानं कॅम्प गाठला आणि त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीची माहिती मिळताच जगभरातून त्याचं कौतुक करण्यात आलं.

FAQ

आंद्रेज बार्गिल कोण आहे आणि त्याने माउंट एव्हरेस्टवर काय धाडसी कामगिरी केली?
आंद्रेज बार्गिल हा 37 वर्षीय पोलिश गिर्यारोहक आणि स्किईंग स्पर्धाकार आहे. त्याने 22 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळमधील माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर प्राणवायूशिवाय (ऑक्सिजनशिवाय) चढाई करून पोहोचला आणि पहिल्यांदाच शिखरावरून बेस कॅम्पपर्यंत संपूर्ण स्किईंग केली, तेही ऑक्सिजनशिवाय.

ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट चढाई आणि उतरणे कसे शक्य झाले?
बार्गिलने प्रचंड आत्मविश्वास आणि तयारीच्या बळावर हे केले. 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर ऑक्सिजनशिवाय चढणे अतिशय धोकादायक असते, पण त्याने शारीरिक आणि मानसिक तयारी करून पहिल्यांदाच शिखरावरून स्किईंग केली.

ही कामगिरी का ऐतिहासिक आहे?
बार्गिल पहिला व्यक्ती आहे ज्याने एव्हरेस्टवर ऑक्सिजनशिवाय चढून आणि स्किईंग करून उतरला. पूर्वी 2018 मध्ये त्याने स्किईंग केली होती, पण ऑक्सिजन वापरला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुलसीदास मंत्र जप भाव जीवन प्रभाव, हिंदीमध्ये मंत्रजपाचे फायदे, भक्तीबद्दल प्रेरक कथा

0
6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआयुष्यात कधीकधी आपले मन कोणत्याही कामात लागत नाही. कधी थकवा, कधी ताण, कधी निराशा आणि कधी मनातील गुंतागुंत आपल्याला पूजा-पाठ,...

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती ! – सुराज्य...

0
झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !  मुंबई : पावसाळ्यात वारंवार झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती...

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का ?

0
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची तीन स्मरणपत्रे; कृती अहवाल कधी ? - सुराज्य अभियानाचा सवाल   उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढते प्रदूषण हा आता लाखो नागरिकांच्या आरोग्य,...
spot_img

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....
error: Content is protected !!