Homeदेश-विदेशआयआरसीटीसी चार्ट रिक्तता मोबाइल चेक सुलभ चरणांवर उपलब्ध ट्रेन रिक्त जागा जाणून...

आयआरसीटीसी चार्ट रिक्तता मोबाइल चेक सुलभ चरणांवर उपलब्ध ट्रेन रिक्त जागा जाणून घ्या


आयआरसीटीसी चार्ट रिक्तता: सणासुदी्च्या दिवसांत ट्रेनला भरपूर गर्दी असते. अशावेळी अनेकांना पहिले टेन्शन येते ते म्हणजे ट्रेनमध्ये सीट मिळणार का? ही माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांना पूर्वी खूप वेळ वाट पाहावी लागायची. ट्रेनच्या कोणत्या कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत याची माहिती लगेचच मिळायची. मात्र आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. IRCTC च्या वेबसाइट व मोबाईल अॅपवर असलेल्या Charts / Vacancy फिचरच्या माध्यमातून ट्रेनमध्ये कोणत्या सीट रिकाम्या आहेत व कोणत्या सीटसाठी बुकिंग झाले आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

IRCTC वर सीट चेक करण्याची सोप्पी पद्धत

जर तुम्ही ट्र्रेनने प्रवास करत असाल तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत. त्यामुळं तुम्हाला तिकीट काढण्यास जास्त मेहनत करावी लागणार नाही. फक्त तुम्हाला IRCTCवर वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

सगळ्यात पहिले IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाईल अॅप ओपन करा.

थोडे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला Charts / Vacancy चा पर्याय दिसेल.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेन नंबर किंवा प्रवासाची तारिख टाकायची आहे.

तुमची पूर्ण माहिती टाकल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल येईल.

यात कोणत्या कोचमध्ये किती सीट बुक आहेत आणि किती सीट रिकाम्या आहेत हे कळेल.

कोणत्या ट्रेनमध्ये या सुविधा मिळणार

सुरुवातीला या सुविधा फक्त प्रमियम ट्रेनमध्येच उपलब्ध होत्या मात्र आता प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा पाहता रेल्वेने सर्व आरक्षित ट्रेनसाठी सुरू केल्या आहेत. तुम्ही राजधानी, शताब्दी, दुरंतो किंवा एखाद्या मेल/एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला हा पर्याय मिळणारच आहे. रेल्वेचा पहिला चार्ट साधारणतः ट्रेन सुटण्याच्या जवळपास 4 तास आधी तयार होतो. तर, दुसरा आणि शेवटचा चार्ट ट्रेन सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी जारी केला जाणार आहे. दोन्ही वेळेला सीटची स्थिती IRCTC अॅप आणि वेबसाइटवर अपडेट केली जाणार आहे.

ही सुविधा प्रवाशांसाठी फारच उपयोगी ठरणार आहे. आता प्रवाशांना कोच निवडण्यासाठी सोप्प होणार आहे. म्हणजे आता कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत. यामुळं प्रवाशांचा वेळ वाचतो आणि ते त्यांच्या सुविधेनुसार सीट बुक करु शकता.

उदाहरणार्थ, जर एखाद्याला तातडीने ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल, तर तो कोणत्या डब्यात जागा उपलब्ध आहेत ते तपासू शकतात आणि त्यानुसार तिकिटे बुक करू शकतात. सणांच्या काळात जेव्हा जागांची मागणी जास्त असते तेव्हा हे वैशिष्ट्य अधिक उपयुक्त ठरते.

FAQ

1. IRCTC चार्ट/व्हॅकन्सी फीचर म्हणजे काय?

हे फीचर भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध असून, ट्रेनमधील कोणत्या कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत आणि किती बुक झाल्या आहेत याची माहिती देते. हे पहिल्या आणि शेवटच्या चार्टनुसार अपडेट होते.

2. IRCTC वर सीट उपलब्धता कशी तपासावी?

IRCTC वेबसाइट किंवा अॅप ओपन करा.
‘Charts/Vacancy’ पर्यायावर क्लिक करा.
ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि बोर्डिंग स्टेशनची माहिती भरा.
सबमिट केल्यानंतर कोच-वायझ आणि क्लास-वायझ रिकामी सीटांची माहिती दिसेल.

3. चार्ट कधी तयार होतात?

पहिला चार्ट ट्रेन सुटण्याच्या सुमारे ४ तास आधी तयार होतो. दुसरा आणि शेवटचा चार्ट ट्रेन सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी जारी केला जातो. दोन्ही वेळी IRCTC वर अपडेट होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!