Homeदेश-विदेशPM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून नवरात्रीचे गिफ्ट, सोमवारपासून देशात लागू होणार...

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून नवरात्रीचे गिफ्ट, सोमवारपासून देशात लागू होणार ‘ही’ योजना


पंतप्रधान नरेंद्र मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भारतीयांना नवरात्रीचे गिफ्ट दिलं आहे. नवरात्रीचं पर्व सुरु होत आहे, त्याच्या सर्वांना शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहे, असं म्हणत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. अनके जीवनावश्यक वस्तूंवर कर लागणार नसल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. जीएसटीचे नवे रिफॉर्म्स लागू होत असल्यानं आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के टॅक्स स्लॅब राहतील. ज्या वस्तूंवर आधी 12 टक्के कर द्यावा लागायचा त्यातील 99 टक्के वस्तूंवर आता फक्त 5 टक्केच कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी बचत होणारय.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

काय म्हणालेत पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ आणि त्यानंतर एच 1बी व्हिसावर वाढवलेले शुल्क या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा नारा महत्त्वाचा आहे, त्यांनी यावेळी बोलताना जनतेला स्वदेशी वस्तूच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे, जी वस्तू तयार करण्यासाठी देशातील लोकांची मेहनत लागली आहे, अशाच वस्तू खरेदी करा असं त्यांनी म्हटलं आहे, तसंच ज्या वस्तू देशात तयार करता येतात, त्या देशातच तयार व्हाव्यात लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे, आपण जे तयार करु, त्याची क्लालिटी जगात गौरव वाढवणारी असावी.

आता फक्त 5 आणि 18 टक्केच टॅक्स स्लॅब

सोमवारपासून देशात नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू होतील
5 आणि 18 टक्के टॅक्स स्लॅबमुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून देशातील जनतेला मोठा दिलासा

दरम्यान 5 आणि 18 टक्केच स्लॅबमुळे कोणत्या वस्तू स्वस्त होणार त्यावर देखील एक नजर टाकुयात

काय स्वस्त?

पनीर, ब्रेड, चिप्स, औषधी, साबण, शॅम्पू,  हेअर ऑईल, मोबाईल, बाईक, स्कूटर, टीव्ही स्वस्त होणार

काय महाग?

एअरक्राफ्ट, यॉट, बंदूक, कॉफीयुक्त पदार्थ, सिगारेट, पान मसाला लक्झरी कार, इत्यादी वस्तू महाग होणार

पंतपधान नरेंद्र मोदींची स्वदेशीचा देखील नारा दिलाय. स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय. स्वदेशी वस्तूंचा गर्व बाळग्याचा सल्ला देखील मोदींनी दिलाय.

पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा

गर्वाने सांगा मी स्वदेशी वस्तूच खरेदी करतो, स्वदेशीच विकतो
स्वदेशीच्या मंत्रातून शक्ती मिळेल स्वदेशी वस्तू सर्वांनी खरेदी करा
‘विदेशी वस्तूंपासून मुक्ती गरजेची, स्वदेशी वस्तू घेण्यावर भर द्या’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी GSTचे नवे दर जाहीर केले आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीच्या नव्या स्लॅबची घोषणा केली. दरम्यान यानंतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी होणार. त्यामुळे याचा सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!