Homeदेश-विदेशक्लाउडबर्स्ट चामोली भयानक व्हिडिओ उत्तराखंड हवामान नवीनतम अद्यतन प्रवाश्यांनी कठीण काळात भेट...

क्लाउडबर्स्ट चामोली भयानक व्हिडिओ उत्तराखंड हवामान नवीनतम अद्यतन प्रवाश्यांनी कठीण काळात भेट दिली नाही.


चामोली नंदनगर क्लाउडबर्स्ट न्यूज: उत्तराखंडवर (Uttarakhand) निसर्गाची कृपा आहे, असं म्हणता म्हणता याच उत्तराखंडमध्ये आता निसर्ग कोपला असल्याचं चित्र पाहाला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उत्तराखंमधील चमोली इथं असणाऱ्या नंदनदरमध्ये ढगफुटीची घटना घडली आणि एका क्षणात सारंकाही उध्वस्त झालं.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

प्राथमिक माहितीनुसार सध्या या घटनेनंतर पाच नागरिक बेपत्ता असल्याची माहिती असून, 6 घरांचं पूर्ण नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या इथं बचावकार्यास वेग आला असून नागरिकांचा शोध घेण्याचं काम यंत्रणा प्राधान्यानं करताना दिसत आहेत.

राडारोडा वाहत आला आणि…

चमोली येथील ढगफुटीची माहिती मिळताच तातडीनं वैद्यकीय पथक, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अशा पथकांनी घटनास्थळ गाठलं. प्राथमिक माहितीनुसार नंदानगरच्या वॉर्डमधील कुन्तरी लगाफली इथं अतिप्रचंड स्वरुपात झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणात राडारोडा वाहत आला आणि त्यामुळं 6 इमारती या प्रवाहात उध्वस्त झाल्या. या दुर्घटनेनंतर काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले, ज्यामध्ये विध्वंसाचं हे रुप पाहताना काळजाची धडकीच उडत आहे.

मोक्ष नदी धोका पातळीवर…

राडारोडा वाहत आला त्यानंतर एसडीआरएफचं पथक नंदप्रयाग इथं पोहोचलं. तर गोचर इथून एनडीआरएफचं पथकही नंदप्रय़ागच्या दिशेनं रवाना झालं. सीएमओच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असून या भागातून वाहणाऱ्या मोक्ष नदीनंही धोक्याची पातळी ओलांडल्या कारणानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, यंत्रणासुद्धा या संकटावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या उत्तराखंडमध्ये विविध ठिकाणी अशा घटनांमध्ये वाढ झाली असून, हे संकट पाहता इथं येणाऱ्या प्रवाशांनी हवामानाचा अंदाज आणि एकंदर परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घ्यावेत, जेणेकरून स्थानिक प्रशासनावर संकटसमयी अतिरिक्त भार येणार नाही, अशा सूचना केल्या जात आहेत.

FAQ

ढगफुटी ही घटना कधी आणि कुठे घडली?
ही घटना 17 सप्टेंबर 2025 रोजी (बुधवार रात्री सुमारे 1 वाजता) चमोली जिल्ह्यातील नंदानगर घाट क्षेत्रात घडली. मुख्यतः कुन्तरी लगाफली वॉर्ड (Fali Kuntari, Senti Kuntari, भैंसवाडा आणि धुर्मा गावांमध्ये) अतिप्रचंड पावसामुळे ढगफुटी झाली

या ढगफुटीत किती नुकसान झाले?
घर, रस्ते किंवा इतर काय बाधित झाले?उत्तर: प्राथमिक अहवालानुसार, नंदानगरच्या कुन्तरी लगाफली वॉर्डमध्ये 6 घर पूर्णपणे उध्वस्त झाली आणि त्यात मलबा साचला. धुर्मा गावात 4-5-घरांचे नुकसान झाले. रस्ते खराब झाले, वाहने वाहून गेली आणि काही दुकानेही बाधित झाली.

बचावकार्य कसे सुरू आहे? कोणत्या टीम्स सहभागी आहेत?
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) आणि एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. नंदप्रयाग आणि गौचर येथून टीम्स रवाना झाल्या. सीएमओ (चीफ मेडिकल ऑफिसर) यांनी अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय पथके आणि जेसीबी मशिन्स पाठवल्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!