Homeदेश-विदेशAntilia नंतर मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील सर्वात महागड्या शहरात खरेदी केली अख्खी...

Antilia नंतर मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील सर्वात महागड्या शहरात खरेदी केली अख्खी बिल्डिंग, किंमत ऐकून फुटेल घाम


मुकेश अंबानी मालमत्ता: आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुंबई आणि पाम जुमेराहनंतर अमेरिकेतील सर्वात महागड्या शहरात अख्खी बिल्डिंग खरेदी केली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असलेल्या ट्रिबेका इथे मुकेश अंबानी यांनी एक संपूर्ण इमारत विकत घेतली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अंबानी यांनी हा करार 17.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार 153 कोटींमध्ये केला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये अंबानी यांनी मॅनहॅटनच्या वेस्ट व्हिलेजमधील त्यांचे दोन बेडरूमचे आलिशान अपार्टमेंट सुमारे 9 दशलक्ष डॉलर्सना विकले होते आणि त्यानंतरी ही खरेदी करण्यात आली. त्या अपार्टमेंटमधून हडसन नदीचे सुंदर दृश्य दिसत होते. (Mukesh Ambani USA americas New York Tribeca building purchase How much does it cost)

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रिबेका येथील 11 ह्युबर्ट स्ट्रीटवर असलेली ही इमारत सुमारे 10 वर्षांपासून रिकामी होती. मागील मालकांनी ती एका कुटुंबाच्या हवेलीत रूपांतरित करण्याचा प्लन केला होता पण ती कधीही पूर्ण झाली नाही. रिपोर्ट्सनुसार, ही इमारत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची अमेरिकन शाखा असलेल्या RIL USA ने खरेदी केली आहे. ही तीच मालमत्ता आहे जी Ubiquiti कंपनीचे अध्यक्ष आणि CEO रॉबर्ट पेरा यांनी 2018 मध्ये सुमारे $२० दशलक्षला खरेदी केली होती. मालमत्ता खरेदी केल्यानंतर, पेराने प्रसिद्ध वास्तुविशारद एरिक कॉब यांना 17,000 चौरस फूट हवेली डिझाइन करण्याचे काम दिले, पण हवेली कधीही बांधली गेली नाही.

नंतर, माया लिन स्टुडिओने 25 दशलक्ष डॉलर्सचा एक नवीन आराखडा सादर केला, ज्यामध्ये 20,000 चौरस फूट आलिशान घराची रचना करण्यात आली. त्यात 7 बेडरूम, 5,000 चौरस फूट बाहेरची जागा, अर्ध-ऑलिंपिक आकाराचा स्विमिंग पूल, अर्ध-एनबीए आकाराचा बास्केटबॉल कोर्ट, दुहेरी-उंचीचा लिव्हिंग रूम आणि एक भव्य डायनिंग हॉल समाविष्ट होता. पण, या सर्व योजना कागदोपत्रीच मर्यादित राहिल्या आणि आता भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी या संपूर्ण इमारतीचे नवे मालक झाले आहेत.

FAQ

1. मुकेश अंबानींनी न्यूयॉर्कमध्ये कोणती मालमत्ता खरेदी केली?
मुकेश अंबानींनी न्यूयॉर्क शहरातील ट्रिबेका भागातील ११ ह्युबर्ट स्ट्रीट येथील एक संपूर्ण इमारत खरेदी केली आहे. ही इमारत सुमारे १० वर्षांपासून रिकामी होती आणि मागील मालकांनी ती कुटुंब हवेलीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला होता, जो पूर्ण झाला नाही.

2. या इमारतीची किंमत किती आहे?
इमारत १७.४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १५३ कोटी रुपये) मध्ये खरेदी केली गेली. ही खरेदी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अमेरिकन शाखा RIL USA ने केली आहे.

3. ट्रिबेका भागाचे वैशिष्ट्य काय आहे?
ट्रिबेका (Triangle Below Canal Street) हा न्यूयॉर्क शहरातील एक अतिशय महागडा आणि आलिशान भाग आहे, जिथे सेलिब्रिटी, उद्योगपती आणि कलाकार राहतात. या भागातील मालमत्तांच्या किंमती खूप जास्त असतात, आणि हा न्यूयॉर्कच्या हृदयस्थानी आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!