Homeदेश-विदेशबिझिनेस न्यूज इन्फोसिसने 18000 कोटी रुपयांच्या नवीनतम अद्यतनाच्या सर्वात मोठ्या शेअर बायबॅकची...

बिझिनेस न्यूज इन्फोसिसने 18000 कोटी रुपयांच्या नवीनतम अद्यतनाच्या सर्वात मोठ्या शेअर बायबॅकची घोषणा केली


इन्फोसिस शेअर्स बायबॅक: भारतात दर दिवशी (India Share Market) शेअर बाजारामध्ये कोट्यवधींची किंबहुना अब्जावधींची उलाढाल होते. मात्र गुरुवारचा दिवस मावळतीला गेल्यानंतर किंबहुना शेअर बाजाराचं दिवसभराचं सत्र संपल्यानंतरच देशातील एका मोठ्या IT कंपनीनं असा काही निर्णय घेतला की, शेअर बाजारातील निष्णांतांचीही या निर्णयाकडे नजर रोखली. ही कंपनी Infosys. या कंपनीनं आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शेअर बायबॅकची घोषणा करण्यात आली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

उपलब्ध माहितीनुसार कंपनीनं 18,000 कोटी रुपयांमधून तब्बल 10 कोटी शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कंपनीचं हे बायबॅक टेंडर रुटनं होणार असून, यामध्ये शेअरचा दर 18000 रुपये प्रति शेअर इतकी निर्धारित करण्यात आली आहे. सद्यस्थितीला असणाऱ्या किमतीच्या तुलनेत हे दर 19 टक्के अधिक असून, सध्या या शेअरची किंमत 1512 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीच्या लिस्टींगनंतर हे सर्वात मोठं बायबॅक असल्याचं म्हटलं जात आहे.

काय आहे ही बायबॅकची प्रक्रिया?

‘टेंडर ऑफर रूट’नं बायबॅक करण्याचा अर्थ असा की, कंपनी निश्चित दरानं काही शेअर खरेदी करणार. ही किंमत बाजार मुल्याहून अधिक असेल आणि ही ऑफर काही वेळापुरताच सीमित असेल. यामध्ये शेअर होल्डर कंपनीला आपले शेअर देऊ शकतात. प्रस्तावित शेअरची संख्या जास्त झाल्यास त्यांना ‘प्रपोर्शनेट बेस’वर स्वीकारलं जाईल. यामुळं गुंतवणुकदारांना निश्चित मूल्याची हमीसुद्धा मिळणार. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे इन्फोसिसकडून घेण्य़ात आलेला हा बायबॅकचा पाचवा निर्णय असून, याआधी 2017 मध्ये 13000 कोटी, 2019 मध्ये 8260 कोटी, 2021 मध्ये 9200 कोटी रुपये आणि 2023 मध्ये 9300 कोटी रुपये अशा दरानं हे बायबॅक झालं.

आव्हानं असतानाही इतका मोठा निर्णय…

गेल्या काही काळापासून इन्फोसिसला गुंतवणूकदारांचा कमी खर्च करण्याचा स्वभाव आणि AI मुळं कार्यपद्धतीमध्ये करण्यात आलेल्या बदलांचा सामना करावा लागत होता. चालू आर्थिक वर्षातही या कंपनीच्या एकूण कमाईत साधारण 1 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्यचा अंदाज आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जूनच्या अखेरीस या कंपनकडे 40000 कोटींची रोकड आणि काही गुंतवणूक असून, अशा परिस्थितीत बायबॅक मॅनेजमेंटनं कंपनीला लाँग टर्म लिक्विडीटी प्रवाह आणि आर्थिक वृद्धीवर कंपनीनं विश्वास ठेवला आहे.

गुंतवणुकदारांना यातून काय फायदा?

आर्थिक क्षेत्र आणि शेअर बाजार विश्वातील जाणकारामच्या माहितीनुसार कंपनीच्या या बायबॅकसंदर्भातील निर्णयामुळं ईपीएस आणि आरओईमध्ये सुधारणा होण्याचे संकेत आहेत. डिविडेंटच्या तुलनेत इथं कर आधारित परतावा मिळतो. त्यातच कंपनीकडे अतिरिक्त रोकड असल्या कारणानं कॅपिटल स्ट्रक्चरही उत्तम असेल.

FAQ

इन्फोसिसने शेअर बायबॅकची घोषणा कधी आणि काय केली?
इन्फोसिसने 11 सप्टेंबर 2025 रोजी बोर्ड बैठकीत आतापर्यंतची सर्वात मोठी शेअर बायबॅकची घोषणा केली. कंपनी 18,000 कोटी रुपयांसाठी 10 कोटी शेअर्स खरेदी करणार आहे. हा बायबॅक कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 2.41% इतका आहे.

बायबॅकचा दर किती आहे आणि तो सध्याच्या किंमतीपेक्षा किती जास्त आहे?
बायबॅकचा दर प्रति शेअर 1,800 रुपये निश्चित करण्यात आला आहे. सध्याच्या बाजार किंमतीच्या (सुमारे 1,512 रुपये) तुलनेत हा दर 19% प्रीमियम आहे. यामुळे शेअरधारकांना बाजार मूल्याहून जास्त किंमत मिळेल

शेअर बायबॅकची प्रक्रिया काय आहे?
हा बायबॅक ‘टेंडर ऑफर रूट’द्वारे होईल. यात कंपनी निश्चित दराने (1,800 रुपये) शेअर्स खरेदी करेल, जो बाजार मूल्याहून जास्त असेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असेल.

(वरील माहिती उपलब्ध संदर्भावर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय जाणकारांच्या मार्गदर्शनानंतरच घ्यावेत.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!