Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी चीनला भेट द्या टॉप ईयू नेतृत्व फोनवर फोनवर बोलले. युक्रेनच्या...

पंतप्रधान मोदी चीनला भेट द्या टॉप ईयू नेतृत्व फोनवर फोनवर बोलले. युक्रेनच्या समाप्तीसह रशिया समाप्त होण्यास मदत करण्यास मदत केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी: हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एससीओ समिटमध्ये सहभाग घेतला, जिथं त्यांची मुलाखत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासह झाली. तीन नेत्यांमध्ये झालेली ही मुलाखत संपूर्ण जगाच्या दृष्टीनं महत्त्वाची असल्याचं म्हटलं गेलं. अशा या भेटीनंतर तब्बल 120 तासांनंतर भारतात एक फोन आला आणि जागतिक राजकारणातील समीकरणं क्षणात बदलताना दिसली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

पंतप्रधानांना कोणाचा फोन आला?

पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यानंतर 120 तासांमध्येच युरोपीय महासंघ (EU) नं भारताशी संपर्क साधला आणि यादरम्यान युक्रेनशी सुरू असणाऱ्या युद्धसमाप्तीसाठी रशियाची मनधरणी करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली. युरोपीय महासंघाच्या या विनंतीवर उत्तर देताना भारतानं कायमच संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं उपाय काढण्याचं समर्थन केलं असून, हीच भूमिका पुढंही कायम राहील असं स्पष्ट केलं.

पंतप्रधान मोदी आणि युरोपीय महासंघाचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यादरम्यान यावेळी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. यादरम्यान दोन्ही देशांच्या वतीनं भारत-ईयू फ्री ट्रेड अॅग्रीमेंट अर्थात एफटीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही जोर देण्यात आला. लेयेन आणि पूर्ण युरोपीय परिषदेनं भारताचा दौरा केला असून, या वर्षअखेरीपर्यंत हा करार पूर्णत्वास नेण्याचं लक्ष निर्धारित केलं होतं.

दरम्यान कोस्टा आणि लेयेन यांनी या संभाषणनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा काही तपशील जाहीर केला. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, ‘रशियातील युद्ध संपवण्यासाठी शांततेच्या दिशेनं जाणारी वाट निवडण्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे’. यावेळी युरोपीय महासंघाकडून युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह भारताच्या सुरु असणाऱ्या संवादाचंही स्वागत करण्यात आलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं माहिती देत काय म्हटलं?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही यासंदर्भातील माहिती देताना दूरध्वनीवरील संपर्कादरम्यान क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, जिथं युद्ध थांबवण्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. भारताकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीतही या नेत्यांनी भारत- युरोपातील राजकीय भागिदारीवर अधिक जोर दिल्याचं सांगत जागतिक आव्हानांचा सामना करून त्यावर तोडगा काढणं हा त्यामागचा हेतू असल्याचं स्पष्ट केलं.

FAQ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणाचा फोन आला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युरोपीय महासंघाचे (EU) अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांचा संयुक्त दूरध्वनी आला. ही चर्चा 4 सप्टेंबर 2025 रोजी झाली.

या फोन कॉलचं मुख्य कारण काय होतं?
या फोन कॉलदरम्यान युरोपीय महासंघाने भारताला रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाची शांतता वार्तेसाठी मनधरणी करण्याची विनंती केली. तसेच, भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार (FTA) लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही चर्चा झाली.

भारताची युक्रेन युद्धाबाबत भूमिका काय आहे?
पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन युद्धाच्या शांततापूर्ण समाधानासाठी आणि लवकरात लवकर शांती व स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण समर्थनाची पुनरुक्ती केली. भारताने नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे युद्ध संपवण्यावर जोर दिला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!