Homeदेश-विदेशजीएसटी स्लॅबचा मध्यमवर्गाचा किती फायदा होईल? सामान्य लोकांशी संबंधित 5 मोठे प्रश्न

जीएसटी स्लॅबचा मध्यमवर्गाचा किती फायदा होईल? सामान्य लोकांशी संबंधित 5 मोठे प्रश्न


जीएसटी नवीन बदल: बुधवारी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, जिथं 12 आणि 28 टक्क्यांची जीएसटी प्रणाली स्थगित करत 5 आणि 18 टक्के जीएसटी करप्रणालीच लागू ठेवण्यात आली. या निर्णयानंतर साबणापासून दे कॉफी, बटरपर्यंत दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींच्या किमतींवर थेट परिणाम झाले. आरोग्य विमा आणि तत्सम सुविधासुद्धा सरकारनं करमुक्त करत सामान्य वर्गाला मोठा दिला. अशा या महत्त्वपूर्ण बदलासंदर्भात सामान्यांच्या मनात काही प्रश्नांनी घर केलं, त्याचीच ही उत्तरं…

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

कधीपासून लागू होणार नवे दर?

जीएसटी संदर्भातील नव्या सुधारित प्रणालीनुसार बदल करण्यात आलेले दर 22 सप्टेंबर 2025 पासून सर्व वस्तू आणि सेवांवर लागू होणार आहे. इथं तंबाखूजन्य पदार्थांचे दर मात्र कायम राहणार असून त्याच्या दरांची घोषणा नंतर केली जाईल.

कोणत्या गोष्टींचे दर मोठ्या फरकानं स्वस्त झाले?

मोदी सरकार आणि जीएसटी परिषदेनं कराची टक्केवारी घटवत असताना दैनंदिन वापरातील वस्तूंवर अधिक भर दिला. ज्यामध्ये टॉयलेट सोप, शँपू, टूथ ब्रश, शेविंग क्रिम, हेअर ऑईल, फेस पावडर अशा गोष्टींवरील जीएसटीचे दर 5 टक्क्यांवर आणण्यात आले. तर, खाण्यापिण्याच्या गोष्टींवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला. प्री पॅकेज्ड फूड, भुजिया अशा गोष्टींवरील जीएसटीसुद्धा 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

औषधांवर किती जीएसटी आकारला जाणार?

सर्व औषधांवरील जीएसटीचे दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. तर, जीवनरक्षक औषधांवर आकारला जाणारा 12 टक्के जीएसटी शून्य करण्यात आला असून, यामध्ये 33 औषधांचा समावेश आहे. वैद्यकिय,  शस्त्रक्रिया, वेटरनरी आणि शास्त्रीय वापरात येणाऱ्या अनेक उपकरणांवरील जीएसटीमध्येही कपात करण्यात आली आहे.

आरोग्य विम्यावर किती कपात?

लाइफ आणि हेल्थ इंश्योरेंसवरील प्रीमियमवर लावण्यात येणारा जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला असून, आधी या सुविधांसाठी 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता मात्र GST चा भुर्दंड नसल्यानं सामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

वाहनं स्वस्त झाली पण किती?

पेट्रोल, पेट्रोल हाइब्रिड कार, LPG, LNG कार खरेदीवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. मात्र यासाठी एक अट असून, पेट्रोल आणि सीएनजीवर चालणारी वाहनं 1200cc हून अधिक नसावं, त्यांची लांबी 4 मीटरहून अधिक नसावी. डिझेल आणि हायब्रिड कारवरसुद्धा 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!