Homeदेश-विदेशपाकिस्तान कनेक्शनच्या धोरणात्मक चिंतेवर भारत अझरबैजान एससीओ सदस्यता रोखतो

पाकिस्तान कनेक्शनच्या धोरणात्मक चिंतेवर भारत अझरबैजान एससीओ सदस्यता रोखतो


भारतीय सामरिक भूमिका: पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगतचे अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षामध्ये पाकिस्तानच्या बाजूने दोन देश ठामपणे उभे राहिले होते. तुर्किये आणि अझरबैजान! यापैकी तुर्कियेला भारतीयांनी बॉयकॉटचा इशारा देत आर्थिक नाकेबंदी केली. विशेष म्हणजे या घटनेच्या तीन महिन्यानंतर भारताने अझरबैजानचाही हिशेब चुकता केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी उपस्थित राहिलेल्या चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या मंचावरुन भारताने अझरबैजानला धडा शिकवला.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

मोदी या बैठकीला होते उपस्थित

मुस्लिमबहुल देश असलेल्या अझरबैजानने (Azerbaijan ) चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीनंतर भारतावर गंभीर आरोप केला आहे. चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्यत्वाचा अझबैजानचा अर्ज भारताने रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी एसीओच्या परिषदेतमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत होते. भारताचा शत्रू देश असलेल्या पाकिस्तानशी अझरबैजानची मैत्री वाढत असल्याचं मागील काही महिन्यामध्ये दिसू नालं आहे. अझबैजानने अनेक वेळा भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानची साथ दिली आहे. या कारणांमुळे भारताने एससीओमधील त्यांचे सदस्यत्व रोखल्याचा आरोप आता अझरबैजानने केला आहे.

चीनचा पाठिंबा

अझबैजानमधील माध्यमांनी असा दावा केला आहे की चीनच्या तियानजिनमध्ये झालेल्या एससीओ परिषदेत अझरबैजानने सहाय्यक सदस्य म्हणून हजेरी लावले होती. होता. यावेळी अझरबैजानचा सदस्य म्हणून एससीओ परिषदेत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला चीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाठिंबा दिला होता. परंतु भारताने याला कठोर विरोध केला.

भारत अखेरपर्यंत भूमिकेवर ठाम राहिला

अझबैजानच्या माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, भारताने अझरबैजानचे पाकिस्तानशी असलेल्या संबंधामुळे त्यांचा अर्ज रोखल्याचे म्हटले आहे. हे एससीओ परिषदेच्या नियमाविरुद्ध असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.अझरबैजानच्या माध्यमांनी दिलेल्या अहवालात, इल्हम अलीयेव यांनी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर अझरबैजानविरुद्ध कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. मात्र भारताने दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशाला साथ देणाऱ्यांना परिषदेत स्थान देता कामा नये असं म्हणत अझरबैजानला आपला विरोध कायम असल्याचं ठणकावून सांगितलं. भारताच्या या भूमिकेमुळे चीनचा पाठिंबा असूनही अझरबैजानला सदस्यत्व प्रदान करण्यात आलेलं नाही. या भूमिकेच्या माध्यमातून भारताने दहशतवादी समर्थक पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या अझरबैजानचा माज उतरवल्याचं सांगितलं जात आहे.

FAQ

भारत-पाकिस्तान संघर्षात अझरबैजान आणि तुर्कियेची भूमिका काय होती?

मे 2025 मधील भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान अझरबैजान आणि तुर्किये यांनी पाकिस्तानला थेट पाठिंबा दिला. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईची निंदा करत पाकिस्तानबरोबर एकजुटीने सहानुभूती व्यक्त केली आणि नागरी हानीबद्दल शोक व्यक्त केला. तुर्कियानेही भारताच्या कारवाईला “अनावश्यक आक्रमकता” आणि “पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग” असे संबोधत युद्धाचा धोका असल्याचे म्हटले. तसेच, पाकिस्तानने या संघर्षात तुर्की-निर्मित सोंगार ड्रोन्स वापरल्याचे उघड झाले, ज्यामुळे भारतात संताप वाढला.

अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी काय आरोप केले?

अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी एससीओ परिषदेच्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी भेटीत भारतावर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, भारताने अझरबैजानच्या पाकिस्तानशी “बांधवकीय” संबंधांमुळे त्यांच्या एससीओ पूर्ण सदस्यत्वाच्या अर्जाला अडवले आणि हे “बदला” घेण्याचा प्रयत्न आहे. अलीयेव यांनी पाकिस्तानला भारताविरुद्ध “विजय” मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आणि पाकिस्तानशी सैन्य, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याचे आश्वासन दिले.

एससीओ परिषदेत भारताची भूमिका काय होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियानजिन येथील एससीओ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि एससीओ सदस्यांना दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचे आवाहन केले. भारताने अझरबैजानच्या सदस्यत्वाला विरोध करताना आपली भूमिका स्पष्ट केली की, दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशांना समर्थन देणाऱ्या कोणत्याही देशाला एससीओमध्ये स्थान मिळू नये. यामुळे अझरबैजानला पूर्ण सदस्यत्व मिळाले नाही, आणि त्याला “एससीओ पार्टनर” दर्जातच राहावे लागले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!